'बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे भोगवे, निवती समुद्र किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा उसळल्या; सतर्कतेचा इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 10, 2023 11:42 AM2023-06-10T11:42:17+5:302023-06-10T11:42:56+5:30

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने ...

Cyclone Biperjoy causes huge waves on Bhogwe, Nivati coast Sindhudurg | 'बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे भोगवे, निवती समुद्र किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा उसळल्या; सतर्कतेचा इशारा

'बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे भोगवे, निवती समुद्र किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा उसळल्या; सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे, निवती आदी भागात समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळल्या होत्या. किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढला होता.

किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने खबरदारी म्हणून याबात अलर्ट राहण्याचे आदेश सर्व विभागाला दिले होते. समुद्र किनाऱ्यावर अजस्र लाटा आदळत होत्या. किल्ले निवती, भोगवे किनाऱ्यावर या भरतीचा प्रभाव जाणवला. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. भोगवे समुद्र किनारी पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. लाटांचा प्रभाव वाढल्याने पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद घेतला.

पुढील तीन दिवस किनारपट्टी भागात वादळीवारे आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय समुद्रात १०५ ते १५० तर किनारपट्टीला ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. लाटांच्या उंचीतदेखील वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून मच्छीमार, पर्यटक आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

वादळामुळे मोसमी पाऊस आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. १० जूनला मान्सून कोकण किनारपट्टी भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cyclone Biperjoy causes huge waves on Bhogwe, Nivati coast Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.