देवबाग किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका

By admin | Published: August 7, 2015 11:29 PM2015-08-07T23:29:42+5:302015-08-07T23:29:42+5:30

वीजवाहिन्या तुटल्या : घरांवर झाड कोसळून लाखोंची हानी

The cyclone hit the Deobag coastline | देवबाग किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका

देवबाग किनारपट्टीला चक्रीवादळाचा फटका

Next

मालवण : देवबाग किनारपट्टीवर शुक्रवारी दुपारी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वारा व पावसात ठिकठिकाणी माडाची झाडे घरांवर कोसळून लाखोंची हानी झाली. देवबाग-मालवण मार्गावर माड कोसळल्याने वाहतूक सायंकाळपर्यंत ठप्प होती, तर वीजवाहिन्या तुटल्याने वीज वितरणलाही हजारो रुपयांचा फटका बसला. वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आला नव्हता. देवबागवासीयांना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांचा जोर कायम असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. देवबाग गावात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हाहाकार माजवला. वादळी वाऱ्यात देवबाग येथील सनदकुमार कुपकर व नंदकुमार कुपकर यांच्या घरावर माड कोसळल्याने घर व दुकान यांचे सुमारे ५० हजार ते १ लाखाचे नुकसान झाले आहे. यावेळी सानिका संजय कुपकर या घरात होत्या, तर घरातील अन्यसदस्य व मुले हे बाहेर होते. वाऱ्याचा जोर वाढल्याने त्या घराबाहेर आल्या असता घरावर माड कोसळल्याने घराचे छपर जमीनदोस्त झाले. यावेळी सनद यांची आई वैशाली कुपकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने मोठा धक्का बसला आहे. यावेळी सखाराम सारंग, नादार तुळसकर, विल्सन तुळसकर, राजा मालंडकर, झुजे फर्नांडिस, ज्ञानेश्वर सारंग, अरविंद धुरी आदी ग्रामस्थांनी घरावरील माड हटवत घरावर तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री घालून सहकार्य केले. गणेश कुमठेकर यांच्या घरावरही माड कोसळून घराचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले. देवबाग ग्रामपंचायतनजीक असलेल्या उत्तम गोविंद तारी, वासुदेव गोविंद तारी, उर्मिला उत्तम तारी, सविता अंकुश तारी, रेखा दशरथ तारी यांच्या सामाईक घरावर माड कोसळून घराचे ५० हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. घरावर माड पडल्याने घराच्या भिंतीनाही तडे गेले असून घर धोकादायक बनले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे. यावेळी तलाठी यांनी पंचनामे केले. (प्रतिनिधी) लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची देवबाग भेट यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, देवबाग उपसरपंच तमास फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य अपर्णा धुरी, अपर्णा मालंडकर, रमेश कद्रेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. मंदार केणी, हरी खोबरेकर यांनी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला. देवानंद चिंदरकर यांनी पंचायत समितीमार्फत, तर बबन शिंदे यांनीही शिवसेनेच्यावतीने ताडपत्री दिल्या.

Web Title: The cyclone hit the Deobag coastline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.