डी. एड, बी. एड बेरोजगारांना शाळांमध्ये सामावून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: July 12, 2023 04:22 PM2023-07-12T16:22:40+5:302023-07-12T16:23:09+5:30
कणकवली : डी. एड. व बी. एड. बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी ...
कणकवली : डी. एड. व बी. एड. बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आश्वासन भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी दिले.
निवृत्त शिक्षकांना शाळेत पुन्हा सामावून घेण्याच्या निर्णयात वयोमानानुसार काही अडचणी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार व्हावा, असे आपले मत आहे. तसेच जिल्ह्यातील संबधित संघटनानी तशी मागणी केली आहे. त्यामुळे आपण त्या दृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागेवर निवृत्त शिक्षकांना घेण्यासंदर्भात अध्यादेश राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. या आदेशाला जिल्ह्यातील बी.एड., डी.एड.बेरोजगार उमेदवारांच्या संघटनानी विरोध केला आहे. तर दुसरीकडे काही शिक्षक हे वयोमानानुसार त्या ठिकाणी काम करू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत शासनाने ठोस निर्णय घ्यावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.