‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान ‘डीसी रूल’

By admin | Published: August 12, 2015 10:57 PM2015-08-12T22:57:30+5:302015-08-12T22:57:30+5:30

प्रधान सचिवांची बैठक; संचालकांनी सादर केली माहिती.

'D' rules for 'D' Class Municipal Corporations | ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान ‘डीसी रूल’

‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान ‘डीसी रूल’

Next

सागर पाटील- टेंभ्ये  शाळा, शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांची माहिती आॅनलाईन पद्धतीने भरण्यासाठी शासनाने ‘सरल’ प्रणाली विकसित केली आहे. सध्या राज्यभरात ही माहिती भरण्याची प्रक्रिया अत्यंत वेगात सुरु आहे. मात्र, इंटरनेट व सर्व्हरची समस्या निर्माण होत असल्याने शिक्षकवर्गाला अक्षरश: रात्रपाळी करावी लागत आहे. शासनाने ही प्रक्रिया आता अत्यंत सोपी केली आहे. मात्र, सर्व्हर जोडणीच्या समस्येमुळे शिक्षक हैराण झाले आहेत. दिवस-रात्र संगणकाच्या समोर बसूनदेखील जोडणी मिळत नसल्याची तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळत आहे.विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन भरावयाच्या माहितीमध्ये शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सध्यातरी विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरवरून भरता येणार आहे. आधार क्रमांकाचीदेखील सक्ती करण्यात आलेली नाही.
आवश्यक माहितीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, शाळेत प्रवेश घेतल्याची तारीख, प्रवेश घेतल्याची इयत्ता, जनरल रजिस्टर क्रमांक, प्रवेशाचा प्रकार, इयत्ता, तुकडी व माध्यम इतकीच माहिती भरावी लागणार आहे. नेटची सर्व्हीस व्यवस्थित मिळाल्यास एका विद्यार्थ्याची माहिती ३ ते ४ मिनिटात भरुन पूर्ण होत असल्याचे माहिती भरलेल्या शिक्षकांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शाळांसमोर नेटवर्क ची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही माहिती ‘सायबर कॅफे’मध्ये भरता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. राज्यभरातून माहिती भरण्याचे काम सुरु असल्याने सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे.
सलग दोन ते तीन तासच जोडणी राहाते. त्यानंतर बराचवेळ सीस्टम बिझी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दिवसभर सतत प्रयत्न केल्यानंतर १५ ते २० विद्यार्थ्यांची माहिती भरुन पूर्ण होत असल्याचे ग्रामीण भागातील शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांची माहिती भरुन पूर्ण करावयाची असल्याने शिक्षकांना रात्रपाळी करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकवर्ग चांगलाच त्रासून गेला आहे.

‘सरल’च्या सर्व्हरवर येणारा भार टाळण्यासाठी शासनाने विभागनिहाय माहिती भरण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर विभागासाठी २० ते २३ आॅगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत सर्व शाळांनी विद्यार्थी, शिक्षक व शाळेसंदर्भातील माहिती भरावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन माहितीमध्ये ‘आधार’ क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक नोंदविणे सध्या ऐच्छिक करण्यात आले आहे. आधार क्रमांक नाही म्हणून विद्यार्थ्याची नोंदणी थांबू नये. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्याची नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे. सध्यातरी विद्यार्थ्यांची आॅनलाईन माहिती भरताना आधारची आवश्यकता नाही. एखाद्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसले तरीही त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. आधारकार्ड मिळाल्यानंतर आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे.
- किरण लोहार, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.


सरल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या भराव्या लागणाऱ्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सर्व माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरवरुनच भरता येणार आहे. माहिती अत्यंत कमी असल्याने माहिती भरण्यासाठी फार वेळ लागणार नाही. कुटुंब, बँक खाते, उत्पन्न याबाबतची माहिती भरावी लागणार नसल्याने सरल प्रक्रिया सोपी झाली आहे.
- डी. एस. पवार, उपशिक्षणाधिकारी

Web Title: 'D' rules for 'D' Class Municipal Corporations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.