सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 13, 2022 11:18 AM2022-09-13T11:18:12+5:302022-09-13T11:19:51+5:30

मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले

Damage due to collapse of house wall at Wafoli in Sawantwadi taluka | सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

सिंधुदुर्ग: संततधार पावसाचा फटका; वाफोलीत भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला

Next

बांदा (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण परिसर दलदलयुक्त बनला आहे. आज, मंगळवार सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली तरी आता पडझडीच्या घटना समोर येत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथे घराची भिंत कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे. प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने घरातील व्यक्ती याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

बांदा परिसरात गेले चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वाफोली येथील परब यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील वस्तू व सामानाची नासधूस झाली. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.

चार दिवसांनंतर काहीशी उघडीप

मागील चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. मागील दोन दिवसांत तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा आळवाडी परिसरात पुराचे पाणी घुसले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने पूरपरिस्थिती ओसरली आहे. मात्र पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही.

Web Title: Damage due to collapse of house wall at Wafoli in Sawantwadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.