नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:19 PM2019-11-03T23:19:24+5:302019-11-03T23:19:28+5:30

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...

Damaged farmers should not be disturbed | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

Next

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जास्तीत जास्त व तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे, असे आश्वासन युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कुडाळ तालुक्यातील शेतकºयांना दिले. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांनी शेतबांधावर बसूनच शेतकºयांशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते नागेंद्र्र परब, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, तहसीलदार रवींद्र्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, राजू जांभेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी तसेच इतर अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेती बागायतींसह मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील निवजे, माणगाव येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही शिवसेनेच्यावतीने राज्यपालांकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रथम कोकणातील शेतकरी व मच्छिमार बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. सध्या मराठवाडा दौºयावर असलेले उद्धव ठाकरे लवकरच कोकणात येऊन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Damaged farmers should not be disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.