धरणाचे दरवाजेच उघडले

By admin | Published: March 15, 2015 11:36 PM2015-03-15T23:36:24+5:302015-03-16T00:10:00+5:30

खेडमधील घटना : बुडून मृत्यू झाल्यानंतर अज्ञातांचे कृृत्य

The dam's door was opened | धरणाचे दरवाजेच उघडले

धरणाचे दरवाजेच उघडले

Next

खेड : तालुक्यातील बोरज येथील धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर धरणातील पाणी दुषीत झाल्याचा शोध लावून अज्ञातांनी चक्क या धरणाचा दरवाजाच उघडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असतानाच केलेल्या कृ त्याबद्दल तालुक्यात संतापाचे वातावरण असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बोरज येथील धरणात मित्रासह पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र यामुळे धरणाचे पाणी प्रदुषित झाले असा जावईशोधच काही ग्रामस्थांनी लावला. एवढेच नव्हे, तर याच ग्रामस्थांनी धरणाचा दरवाजाही उघडला त्यामुळे सध्या ५० टक्के पाणीसाठा असलेल्या धरणातील पाणी वेगाने बाहेर पडू लागले.पाण्याचा वेग एवढा होता की त्यानंतर दरवाजे बसवणे व वाहणारे पाणी थांबवणे कोणालाच शक्य झाले नाही. जवळपास ६ ते ७ तास हे धरण वाहत होते. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालवली आहे.या धरणाची मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे पालिकेने याबाबतची माहिती खेड पोलीस स्थानकात दिली आहे. खेड नगर परिषदेच्या कनिष्ठ पाणीपुरवठा परीवेक्षक सोनाली खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात ग्रामस्थांवर खेड पोलीसांनी भा.दं.वि. कलम ४३० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे भीषण पाणीटंचाईचे संकट समोर उभे असताना अज्ञातांनी केलेल्या या कृ त्याबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञाताचा शोध घेत आहेत. बोरज धरणातील पाणीसाठा या कृत्यामुळे कमी झाला आहे. त्यामुुळे खेड शहरासह चारही गावांना यंदा लवकर पाणीटंचाई जाणवणार आहे. (प्रतिनिधी)

खेडसह चार गावांना फटका
खेड शहरापासून ७ कि.मी. अंतरावर बोरज गावानजीक हे ब्रिटीशकालीन धरण आहे. याच धरणाच्या पाण्यावर बोरज, निगडे, शिवखुर्द, शिवबुद्रुक या चार गावांच्या नळपाणी योजनाही अवलंबून आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या धरणाचे पाणी खेड शहरासह या चार गावांना पुरते. या गावांना यावर्षी पाणीटंचाईचा लवकर फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: The dam's door was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.