मालवणच्या तरुणाचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू

By admin | Published: October 9, 2016 11:27 PM2016-10-09T23:27:11+5:302016-10-09T23:27:11+5:30

डेंग्यूची लागण झाल्याचे निदान

Dangyous fever death of Malvan's youth | मालवणच्या तरुणाचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू

मालवणच्या तरुणाचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू

Next

मालवण : मालवण आडारी येथील रहिवासी सहदेव कान्होजी ढोलम (वय ३३) यांचे डेंग्यूसदृश तापाने निधन झाले. सहदेव यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
सहदेव ढोलम हे मुंबई येथे वास्तव्यास होते. गेले काही दिवस त्यांना ताप, खोकला येत होता. औषधोपचार केल्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डेंग्यूची लागण झाल्याचे निदान केले होते. गेले सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Dangyous fever death of Malvan's youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.