अवकाळी दणका

By Admin | Published: March 25, 2015 10:29 PM2015-03-25T22:29:38+5:302015-03-26T00:09:12+5:30

वीज कोसळून सासोलीत एक जखमी : वैभववाडी, दोडामार्ग, फोंडाघाटात मुसळधार

Dawn | अवकाळी दणका

अवकाळी दणका

googlenewsNext

वैभववाडी/दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, दोडामार्ग आणि कणकवली तालुक्यांत बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सासोली-हेदूस येथील शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन नवसू धाऊसकर (वय ४०) यांच्यावर विजेचा लोळ कोसळून ते गंभीर जखमी झाले. जोराचा वारा आणि विजेच्या लखलखाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, केळी बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वैभववाडीसह फोंडाघाटातही दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. उष्म्याने अंगाची लाही होत असतानाच बुधवारी दुपारनंतर दोडामार्ग तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात दुकानदारांसह सर्वांचीच धावपळ झाली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील केळी बागायतींना फटका बसला. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर आपल्या घराशेजारील गोठ्यात काम करीत असताना विजेचा लोळ कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दोडामार्ग रुग्णालयात ाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने बुधवारी सायंकाळी हजेरी लावली. महिनाभरात तिसऱ्यांदा झालेल्या या पावसामुळे शिल्लक असलेल्या आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच भागात पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापारीवर्गासह नागरिकांची धांदल उडाली होती. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाला. या महिन्यात तिसऱ्यांदा झालेल्या या पावसामुळे शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)

बागायतदारांना मोठा फटका
गेल्या आठवड्यात वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले होते. अखेर सायंकाळी ४.३० च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच मागील पावसात शिल्लक राहिलेल्या आंबा, काजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे.
फोंडाघाटात अर्धा तास पाऊस
फोंडाघाट येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी कणकवली तालुक्यातील इतर भागात उष्णतेची तीव्रता तशीच टिकून आहे.

Web Title: Dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.