वेंगुर्लेत आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:02 AM2019-01-01T11:02:08+5:302019-01-01T11:04:21+5:30
वेंगुर्ले शहरातील निशाण तलावातील सध्या अस्तित्वातील पाण्याचा साठा, हवामान, सध्याचे तापमान व नागरिकांच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात येणार आहे. अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले शहरातील निशाण तलावातील सध्या अस्तित्वातील पाण्याचा साठा, हवामान, सध्याचे तापमान व नागरिकांच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता आज, १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना होणारा पाणीपुरवठा एक दिवस आड करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
याची अंमलबजावणी आज, १ जानेवारीला होणार असून, २ रोजी पाणीपुरवठा सुरळीत राहील. मात्र त्यानंतर एक दिवसाने पाणीपुरवठा करण्यात येईल. सर्व नळ कनेक्शनधारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा, असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केले आहे.
शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील पाण्याची पातळी तपासण्यात आली असून आतापासूनच या पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा मार्च महिन्यापासून मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.