सिंधुदुर्ग महाविद्यालयात डेची धूम सुरू, अंताक्षरी स्पर्धा : प्रथम, व्दितीय वर्ष विज्ञान गटाचा प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:31 PM2017-12-20T14:31:35+5:302017-12-20T14:35:34+5:30
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक शेरवानी परिधान करत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. यावेळी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान आणि द्वितीय वर्ष विज्ञान या गटाने प्रथम क्रमांक मिळविला.
मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्गमहाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक शेरवानी परिधान करत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. यावेळी अंताक्षरी स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान आणि द्वितीय वर्ष विज्ञान या गटाने प्रथम क्रमांक मिळविला.
सिंधुदुर्गमहाविद्यालयात साडी व शेरवानी डे निमित्त युवक-युवती सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विविध डे चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी शेरवानी डे, साडी डे, अंताक्षरी डे साजरा झाला.
२० डिसेंबर रोजी मालवणी डे, गॉगल डे व कॅप डे, २१ रोजी ट्रॅडिशनल डे, २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर २३ रोजी फिश पॉन्ड्स डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, टाय डे होणार आहे.
यानिमित्त आयोजित अंताक्षरी स्पर्धेत स्पर्धकांनी विविध हिंदी- मराठी गाणी म्हणत रंगत आणली. अंताक्षरी स्पर्धेत द्वितीय वर्ष वाणिज्य व अकरावीच्या वर्गांनी संयुक्त द्वितीय तर बारावीच्या वगार्ने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पधेर्चे परीक्षण डॉ. उज्वला सामंत, मिलन सामंत, धामापूरकर यांनी केले. यावेळी डॉ. आर. एन. काटकर, बी. एच. चौगुले, एच. एम.चौगले, डॉ. एम.आर. खोत, कैलास राबते, देविदास हार गिले आदी उपस्थित होते.