प्रिय बापू, तुम्ही मला प्रेरित करीत आहात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2017 03:58 PM2017-07-13T15:58:47+5:302017-07-13T15:58:47+5:30

टपाल विभागाची पत्र लेखन स्पर्धा

Dear Bapu, you are inspiring me | प्रिय बापू, तुम्ही मला प्रेरित करीत आहात

प्रिय बापू, तुम्ही मला प्रेरित करीत आहात

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. १३ : भारतीय डाक विभागामार्फत महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून या वर्षी ढाई आखर अखिल भारतीय पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठीचा विषय हा प्रिय बापू (महात्मा गांधी) तुम्ही मला प्रेरित करीत आहात Dear Bapu (Mahatma Gandhi) you inspire me.. असा आहे व ही स्पर्धा खुली असल्यामुळे स्पर्धेसाठी वयोगटाची मर्यादा नाही. पत्र लेखनाकरिता आपण हिंदी, इंग्रजी किंवा प्रादेशिक भाषा (मराठी) या भाषांचा वापर करु शकता. शब्द मयार्दा लिफाफ्यामधून कोऱ्या ए फोर साईज पेपरवर जास्तीत जास्त १000 शब्द व अंतर्देशीय पत्रावर जास्तीत जास्त ५00 शब्द असेल. स्पर्धकांनी आपले पत्र नजिकच्या डाकघरात उपलब्ध स्वतंत्र लेटर बॉक्स मध्ये दिनांक १५ आॅगस्ट २0१७ पर्यंत टाकावे.

निवडक पत्रांना २ आॅक्टोबर २0१७ रोजी साबरमती आश्रम येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल. तसेच देश पातळीवर व महाराष्ट्र पातळीवर बक्षीस देण्यात येतील. सर्व इच्छूक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर पी. आर. कुलकर्णी यांनी कले आहे. सविस्तर माहितीकरिता जवळील डाकघरशी संपर्क साधवा किंवा  www.indiapost.gov.in  वर लॉगआॅन करा.

राष्ट्रीय स्वर्ण बंधपत्र योजना

भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्वर्ण बंधपत्र (सॉवरेन गोल्ड बॉण्ड) ही नवीन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये दिनांक १० जुलै २०१७ ते १४ जुलै २०१७ या मर्यादित कालावधीकरिता सुरु करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या नवीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक पी. आर. कुलकर्णी यांनी केले आहे. अधिक तपशीलासाठी डाकघर अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा.

Web Title: Dear Bapu, you are inspiring me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.