स्वामी चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Published: October 18, 2015 12:04 AM2015-10-18T00:04:46+5:302015-10-18T00:23:25+5:30

महान येथील दुचाकी अपघातात गंभीर जखमी

Death of Swami Chavan during treatment | स्वामी चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू

स्वामी चव्हाणचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

मालवण : मालवण महान मार्गावर शुक्रवारी १६ आॅक्टोबरला झालेल्या मोटरसायकल अपघातातील गंभीर जखमी स्वामी कृष्णा चव्हाण (२३, रा. आंगणेवाडी) याचा शनिवारी सकाळी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वामी याच्या मृत्यूने आंगणेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
शुक्रवारी सकाळी स्वामी हा आंगणेवाडी येथून मालवणच्या दिशेने येत असताना मालवण येथून आंगणेवाडी येथे जात असलेल्या दिनेश आंगणे या दोघात महान येथील अवघड वळणावर दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात स्वामी याच्या डोक्याला गभीर दुखापत झाली होती. दिनेश याच्याही हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. स्वामी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. दोघांवरही वैद्यकीय अधिकारी सुरेश पांचाळ व डॉ. अजित लिमये यांनी उपचार केले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. तर दिनेश याच्यावर कुडाळ येथे उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने स्वामी हा कोमात गेला होता. मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्वामी याचा आज सकाळी गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपले शालेय व बारावीपर्यंत शिक्षण मालवण येथे पूर्ण करून तो नोकरी निमित्त मुंबईला गेला होता. काही दिवसापूर्वी कामानिमित तो मालवणला आला होता. त्याच्या मृत्यूनंतर व्यवसाय उभारणीचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. स्वामी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Death of Swami Chavan during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.