भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:08 PM2018-07-14T16:08:02+5:302018-07-14T16:10:05+5:30

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला.

Debris removed in Bhubaboda Ghat; traffic facilitates, construction department campaigns at war level | भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

Next
ठळक मुद्देभुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीतबांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

प्रकाश काळे

वैभववाडी(सिंधुदुर्ग): भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला.

शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गगनबावड्यापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळून खारेपाटण गगनबावडा राज्यमार्ग ठप्प झाला होता. या मार्गाची वाहतूक करुळमार्गे वळविण्यात आली होती.

दरडीच्या ढिगा-यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणा-या पावसाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग बंद राहण्याची शक्यता होती. परंतु, युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून दुपारी 3 च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले.

Web Title: Debris removed in Bhubaboda Ghat; traffic facilitates, construction department campaigns at war level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.