कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन, बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 01:03 PM2021-02-11T13:03:00+5:302021-02-11T13:05:32+5:30

woman morcha sindhudurg- महिला बचतगटांनी देशात लॉकडाऊन होण्यापूर्वी घेतलेले कर्ज माफ व्हावे. दांडगाईने, जबरदस्तीने होत असलेल्या कर्जवसुलीला रोखण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

Debt agitation for debt waiver, demand of Bahujan Mukti Party | कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन, बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

लॉकडाऊन होण्यापूर्वी बचतगटांनी घेतलेले कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (छाया - मनोज वारंग)

Next
ठळक मुद्देकर्जमाफीसाठी धरणे आंदोलन, बहुजन मुक्ती पार्टीची मागणी बचतगटांनी घेतले होते कर्ज

सिंधुदुर्ग : महिला बचतगटांनी देशात लॉकडाऊन होण्यापूर्वी घेतलेले कर्ज माफ व्हावे. दांडगाईने, जबरदस्तीने होत असलेल्या कर्जवसुलीला रोखण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन मुक्ती पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

भारत मुक्ती मोर्चामहिला संघ राज्य उपाध्यक्षा माया जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला प्रसाद जळवी, सगुण जाधव, राजू कदम, के. एस. कदम, संकेत कुडाळकर, अनिकेत जाधव, शिल्पा इंगळे, बी. बी. जाधव यांच्यासह जिल्हाभरातील तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनातून विविध १५ मागण्या केल्या. फडणवीस सरकारने ३४ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्ज बँकांना चुकते केले. दरवर्षी, लाखो, करोडो रुपयांची सबसिडी उद्योगपतींना दिली जाते. मात्र, गरज असलेल्या बचत गटांच्या महिलांनी घेतलेल्या कर्जाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यात सोमवारी आंदोलन केले. त्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.


 

Web Title: Debt agitation for debt waiver, demand of Bahujan Mukti Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.