ओटवणेत दशक्रोशी पर्यटन महोत्सव

By admin | Published: January 22, 2015 11:24 PM2015-01-22T23:24:12+5:302015-01-23T00:44:11+5:30

पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन : २५ जानेवारीपासून सुरूवात

Decimal Tourism Festival in Ottawa | ओटवणेत दशक्रोशी पर्यटन महोत्सव

ओटवणेत दशक्रोशी पर्यटन महोत्सव

Next

सावंतवाडी : ओटवणे दशक्रोशी विकास समिती आणि डी. के. टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशक्रोशी पर्यटन महोत्सव २०१५’ चे आयोजन ओटवणे रवळनाथ मंदिर येथे २५ ते २८ जानेवारी या कालावधीत केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटनतज्ज्ञ डि. के. सावंत, प्रभाकर गावकर, गजानन सावंत, राजाराम दळवी, प्रकाश दळवी, भाई देऊलकर, दिनानाथ बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता असनिये जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे ‘आदिवासी नृत्य’, जिल्हा परिषद असनिये शाळेच्या मुलांचा दशावतारी नाट्यप्रयोग, ९ वाजता सिंधुदुर्गकन्या जादूगार पूर्वा हिचा जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, उद्योजक पुष्कराज कोले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ओटवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टिपरी व धनगरी नृत्य, विलवडे प्राथमिक शाळेचे दशावतारी नाट्य, विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाची एकांकिका, रात्री ९ वाजता संयुजा कलामंच, माजगाव यांच्या ‘अजून शिगमा संपला नाही’ व ‘बिजांकूर’ या एकांकिका, तसेच कालिका प्रासादिक कला मंच, माजगाव यांची ‘प्रवेश दुसरा’ ही एकांकिका असे कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम पालयेकर, माजी सभापती बाळा गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. २८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी ओटवणे दशक्रोशी विकास समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभानंतर रात्री १० वाजता माऊली दशावतार नाट्यमंडळ, सोनुर्ली प्रस्तुत ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओटवणे दशक्रोशी विकास समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

भव्य शोभायात्रा ठरणार आकर्षण
उद्घाटन समारंभाला सावंतवाडीचे माजी आमदार जयानंद मठकर, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या हस्ते होणार आहे.
सायंकाळी विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय ते श्री रवळनाथ मंदिर काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेचे उद्घाटन राजमाता भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये पारंपरिक वेशात बावळाट लेझीम-ढोलपथक, दशावतार, वारक री, चपई नृत्य, शिवाजी मावळे, पर्यावरण दिंडी सादर केली जाणार आहे.

Web Title: Decimal Tourism Festival in Ottawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.