corona virus-कुणकेश्वर देवस्थान बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:03 PM2020-03-19T16:03:14+5:302020-03-19T16:07:08+5:30
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान बंद करण्यात आले आहे.
कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान बंद करण्यात आले आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून आपल्या देशासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. हा विषाणू सांसर्गिक आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने देश-विदेशातील भाविक तसेच पर्यटक दर्शनाबरोबरच पर्यटनासाठी येत असतात. त्यानिमित्त खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री कुणकेश्वर मंदिर हे १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहे.
मंदिरातील नित्यविधी, पूजा, आरती, अभिषेक, एकादष्णी आदी चालू असतील. तसेच दिवसातून तीन वेळा मंदिर साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य फ्लोअर क्लिनर वापरण्यात येणार असून भक्तनिवासदेखील बंद ठेवण्यात येणार आहे.
आतापर्यंत करण्यात आलेले बुकींगदेखील रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टतर्फे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, सरपंच श्रुती बोंडाळे, वाडीवार अध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते.