लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:00 PM2021-01-02T14:00:35+5:302021-01-02T14:03:01+5:30

Irrigation Projects Sindhdudurg- अनेक प्रकल्पांच्या घोषणा आजवर झाल्या; मात्र ठेकेदाराकडून मलिदा मिळवून प्रकल्प अर्धवट सोडण्यात आले. आता कणकवली तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. भिरवंडे आणि गांधीनगर येथील बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राऊत यांच्य हस्ते झाला. तसेच स्केटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवलेल्या पार्थ बाळकृष्ण सावंत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

Decision to complete small scale irrigation projects: Vinayak Raut | लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : विनायक राऊत

राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या पार्थ बाळकृष्ण सावंत यांचा सत्कार खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते करण्यात आला.

Next
ठळक मुद्देलघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : विनायक राऊत बिनविरोध आलेल्या सदस्यांचा सत्कार

कणकवली : अनेक प्रकल्पांच्या घोषणा आजवर झाल्या; मात्र ठेकेदाराकडून मलिदा मिळवून प्रकल्प अर्धवट सोडण्यात आले. आता कणकवली तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. भिरवंडे आणि गांधीनगर येथील बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राऊत यांच्य हस्ते झाला. तसेच स्केटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक मिळवलेल्या पार्थ बाळकृष्ण सावंत यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

भिरवंडे खलांतर येथील अण्णा मास्तर यांच्या घरामध्ये छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात राऊत यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शिवसेनेचे नेते बाळा भिसे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कारही करण्यात आला. राऊत म्हणाले, ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची होती, याहीपेक्षा ती बिनविरोध झाली, याला फार महत्त्व आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारे मोठे मानधनही या ग्रामपंचायतीला मिळेल.
मात्र जिल्हा वार्षिक नियोजनातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण या ग्रामपंचायतींसाठी विशेष निधी
देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्याची गरज आहे. ही भूमिका आम्ही पहिल्यापासून ठेवली असून, आता माणगाव खोर्‍यातील छोटी धरणे पूर्ण करणारा, त्याचबरोबर कणकवली तालुक्यात लघुपाटबंधारे १० धरण प्रकल्प रखडलेले आहेत. अशा प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा दोन वर्षात मार्गी लावण्याचा ध्यास आम्ही घेतला.

यासाठी पालकमंत्री आणि मी स्वतः यात लक्ष घालणार असून, सतीश सावंत यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भिरवंडे आणि गांधीनगर येथे सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे मला आनंद आहे.

विकासाची गंगा पुढे नेत आहोत : सतीश सावंत

खासदार राऊत यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पुढे नेत आहोत. सह्याद्री पट्ट्यातील धरण प्रकल्प चांगली संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे यावेळी सतीश सावंत म्हणाले.
 

Web Title: Decision to complete small scale irrigation projects: Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.