आज फैसला !

By admin | Published: February 22, 2017 10:50 PM2017-02-22T22:50:43+5:302017-02-22T22:50:43+5:30

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत निकाल अपेक्षित

Decision today! | आज फैसला !

आज फैसला !

Next



सिंधुदुर्गनगरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५0 जागांचे निवडणूक निकाल आज, गुरुवारी जाहीर होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, विरोधी गटातील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण
राणे आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री
दीपक केसरकर या दोघा दिग्गजांमधील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार,
हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार
आहे.
मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १0 वाजल्यापासून मतमोजणीला त्या-त्या तालुक्यात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणामुळे बदललेली राजकीय समीकरणे, आघाडीत झालेली बिघाडी व युतीत पडलेली फूट यामुळेही राजकीय पातळीवर फार मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे गुरुवारी निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समितीच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार उभे आहेत. एकूण १५0 जागांसाठी ४८५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत.
ले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांपैकी तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदान केले आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पक्षाची कार्यालये, विजयी उमेदवारांच्या रॅलीचे मार्ग यावरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रॅली पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. बदललेल्या सर्वच राजकीय समीकरणांमधून मतदार कौल कोणाला देतात हे आज, गुरुवारीच समजणार आहे. निकाल काय लागतात, यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत एवढे मात्र निश्चित.

जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून, तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ला तालुक्यात, तर सर्वांत कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Web Title: Decision today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.