डी.टी.एड्.ला उतरती कळा

By admin | Published: June 21, 2016 09:39 PM2016-06-21T21:39:12+5:302016-06-22T00:16:54+5:30

नवीन पिढी घडविण्याची क्षमता : अध्यापक विद्यालयांवर शाखा बंद करण्याची नामुष्की

Declaration of D.E.D. | डी.टी.एड्.ला उतरती कळा

डी.टी.एड्.ला उतरती कळा

Next

गुरुप्रसाद मांजरेकर -- मिठबाव -बदलते शासन निर्णय, शिक्षक (नवीन) भरतीवरची बंदी आदी कारणांमुळे गेले तीन ते चार वर्षे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड्. या शिक्षण शाखेवर एक उतरती कळा आली आहे. अनेक विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांवर आपल्या शाखा बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षक पार पाडत असतो. ही सर्व मूल्ये शिक्षकांवर कोरण्याचे काम त्यांच्या विद्यार्थीदशेत या शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयांनी केले आहे.
शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम अर्थातच डी.टी.एड.्ने मागील दोन-तीन दशकात उत्कर्षाचा काळ अनुभवला. शिक्षकी पेशाची आवड असणारे आणि हमखास नोकरीची संधी म्हणून १२वी नंतर विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर या शाखेची निवड करायचा.
आधुनिक संगणक युगात पारंपरिक शिक्षण पद्धती मागे पडत असली तरी आताची पालकपिढी आपल्या पाल्यांना आपल्या काळातील शिक्षण पद्धती व त्याचे उपयोग बऱ्याचवेळा ऐकवितात. अशावेळी या शिक्षणशास्त्र पदविकेत काही प्रमुख बदल घडविल्यास या शाखेस गतवैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. काही बदल सद्य:स्थितीत झालेले आहेत.
जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये निवृत्तीनजीक आलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय असून, पुढील काही वर्षांत शिक्षक भरती करणे शासनाला अनिवार्य ठरणार आहे. खासगी क्लासेस हा मोठा अर्थार्जनाचा मार्ग असून, याकडे मुख्यत: डी.एड.् पदविकाधारकांनी आपले लक्ष वळविणे अपेक्षित
आहे.

अभ्यासक्रमात विविधांगी बदल
या शिक्षण अभ्यासक्रमात काही विविधांगी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विविध स्पर्धा परीक्षा उदा, बॅँक, पोस्ट, एमपीएससी, युपीएससी या परीक्षांना आवश्यक असणाऱ्या ज्ञानाचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकेचे शिक्षण घेत असतानाच विविध फी माफी सवलती, शिष्यवृत्ती यांचा फायदाही या अभ्यासक्रमाला लागू आहे.
नवीन शासननिर्णयानुसार डी. एड.्नंतर विद्यार्थ्याला एम. एड.्ला ही प्रवेश मिळू शकतो.

‘तो’ निर्णय स्वागतार्ह
प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांना ५ वी व ८ वी चा वर्ग जोडण्याचा निर्णय शासन विचाराधीन आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे
डी. एड.् बेरोजगार, सद्य:स्थितीत शिक्षण घेणारे व भविष्यातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


डी.एड. पदवीप्राप्तांना समावून घ्या
डी. एड. झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट शेवटच्या वर्षाला प्रवेश मिळावा. तसेच विविधांगी दृष्टीने विचार करून इतर क्षेत्रातही शासनाने डी. एड. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना सामावून घेऊन बेरोजगारी कमी करावी. विद्यार्थ्यांनीही शिक्षक नोकरी व डी.एड. यांचा सहसंबंध न जोडता हा अभ्यासक्रम निवडावा, असे आवाहन डी. एड. कॉलेज शिक्षक संघटना व महाराष्ट्र टिचर एज्युकेशन असोशिएशनमार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Declaration of D.E.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.