मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:13 PM2022-06-25T18:13:36+5:302022-06-25T18:14:13+5:30

बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे.

Deepak Kesarkar fituri for ministerial post Shiv Sena spokesperson, Criticism of Jayendra Parulekar | मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

मंत्री पदासाठी दीपक केसरकरांची फितुरी, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकरांची टीका

Next

सावंतवाडी : मंत्री पदासाठी आमदार दीपक केसरकरांनी 'फितुरी' केली. अन् दगाफटका करुन शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत. मात्र त्यांना सावंतवाडी मतदार संघातील जनता कधीही माफ करणार नाही अशी जोरदार टिका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.

तीन वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपने पुरस्कृत उमेदवार दिला होता. त्या विरोधात लोक केसरकरांसोबत राहिले, हीच त्या लोकांची परतफेड का? असाही सवाल ही त्यांनी यावेळी केला. परूळेकरांनी प्रसिध्दीपत्रकातून केसरकरांवर आरोप केले आहेत.

महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिकांच्या आणि सामान्य जनतेच्या तीव्र भावना बघता आता शिंदे गटातील फितूर आमदार टोळीने आपल्या गटाचे नाव आता “शिवसेना बाळासाहेब” असं ठेवण्याचं नाटक रचलेलं आहे. बाळासाहेब हे पवित्र नाव सुर्याजी पिसाळाच्या अवलादीने उच्चारणं हा सामान्य शिवसैनिकाचा आणि मतदार राजाचा अपमान आहे. ही सगळी उठाठेव फितूरांचा गट भाजपमध्ये विलीन करून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी आहे हे उघड आहे.

केसरकर आता फितूर गटाचे प्रवक्ते झाले

कारण पक्षांतर बंदी कायद्याच्या शेड्युल १० च्या ४ क्रमांकाच्या अधिनियमानुसार बंडखोर गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन होणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील आमदारांची आमदारकी रद्द होऊ शकते. म्हणजे दिखावा करायला गटाचे नाव “शिवसेना बाळासाहेब” ठेवायचं आणि कमळ हातात घेऊन मंत्रीपद लाटायचं हाच खरा उपक्रम आहे. यासाठीच सुरत आणि गुवाहाटी येथील फाइव्ह स्टार टुरिझम भाजपने प्रायोजित केलेला आहे. तर केसरकर हे आता या फितूर गटाचे प्रवक्ते झाल्याचे कळते.

मंत्रीपदासाठी धडपड

तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराविरोधात सावंतवाडी मतदार संघातील सामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने केसरकरांना निवडून दिलं. आता फितूरी करून दगाफटका देऊन मंत्री आणि पालकमंत्री पद लाटण्यासाठी चाललेली त्यांची धडपड कोकणातील जनता बघत आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करेल का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

Web Title: Deepak Kesarkar fituri for ministerial post Shiv Sena spokesperson, Criticism of Jayendra Parulekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.