निवती रॉक परिसरात स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु करणार : दीपक केसरकर

By admin | Published: May 24, 2017 04:04 PM2017-05-24T16:04:25+5:302017-05-24T16:04:25+5:30

वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिन

Deepak Kesarkar launches scuba-diving facility in Rock Hill area | निवती रॉक परिसरात स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु करणार : दीपक केसरकर

निवती रॉक परिसरात स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु करणार : दीपक केसरकर

Next



आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि २४ : निवती रॉक परिसरात पावसाळ्यानंतर स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु केली जाईल. या बाबत वेंगुर्ल्यांतील युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. वेंगुर्ला बंदर ते निवती पर्यंत सबमरीन सेवा सुरु करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे केले.

वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिना- निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा आस्मिता राऊळ पंचायत समिती सभापती यशवंत परब, मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थितहोते.

मालवण प्रमाणेच आंतर देशीय पर्यटक वेंगुर्ला येथे यावेत या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, वेंगुर्ला नजिकच शिरोडा व आरवली येथे पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प सुरु आहेत. जेष्ठ नागरिकांनाही स्कूबा डायव्हींग करता यावे यासाठीही सुविधा वेंगुर्ला येथेनिर्माण केल्या जाणार आहेत.

वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४0 वर्षाच्या वाटचालीत योगदान देणा-या पदाधिकारी व अधिका-यांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, वेंगुर्ला शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सर्र्वानी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. वेंगुर्ला शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे सुरु रहावा यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेंगुर्ला शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्धापन दिना- निमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशिस्तीपत्र वितरीत करण्यात आले.

राज्यस्तरीय आंबा- काजू परिषदेस भेट

सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नैसर्गिक आंबा व काजू परिषदेस पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासावर आधारीत चांदा ते बांदा हा कार्यक्रम सिंधुदुर्गात सुरु केला आहे. सेंद्रीय शेतीच महत्व ओळखून काजू सेंद्रीय पध्दतीने लागवडीवर भर दिला जात आहे. कृषी विज्ञान केंद्राचे माध्यमातून कर्नल सुधीर सावंत यांनी अत्यंत स्तूत्य असा उपक्रम सुरु केला आहे. कृषी तज्ञ व पद्मश्री सुभाष पालेकर यांच उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतक-यांनी कृषी उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्नशील रहावे.

Web Title: Deepak Kesarkar launches scuba-diving facility in Rock Hill area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.