भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

By admin | Published: July 2, 2017 05:01 PM2017-07-02T17:01:50+5:302017-07-02T17:01:50+5:30

कृषि दिन साजरा : बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशन

Deepak Kesarkar tried to take the average yield of rice production to 100 quintals | भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

भात उत्पादनाची सरासरी हेक्टरी १00 क्विंटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न : दीपक केसरकर

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. 0२ : भात लागवडीच्या सरासरी उत्पादनामध्ये राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम असून काही शेतकऱ्यांनी १३४ क्विंटलपर्यंत भात उत्पादन घेतले आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात सरासरी ३२ क्विंटल एवढेच भात उत्पादन घेतले जाते. ही भात उत्पादनाची सरासरी १0 क्विंटलवर नेवू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतो असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कृषि विभाग महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिन व शेतकरी मेळावा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने उद्यान विद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषि विकास अधिकारी शिवाजीराव शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, कृषि विकास अधिकारी एस. एम. म्हेत्रे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती राजन जाधव, कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उद्यानविद्या महाविद्यालयातीचे प्राचार्य व कर्मचारी, शेतकरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते बॉयोगॅस प्रचार प्रसिध्दीसाठी घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

केसरकर म्हणाले की, शेतकरी आजही पारंपारिक पध्दतीने शेती करतात. या शेतकऱ्यांनी शेती विकासासाठी तयार करण्यात आलेल्या अद्यावत यंत्रणांचा वापर करणे गरजेचे आहे. या जिल्ह्याचे भात पीक हे प्रमुख पीक असून भात हे मुख्य अन्न आहे.

अलीकडे एस. आर. आय पध्दत विकसित झाली असून यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेता येत आहे. याचा वापर शेतक-यांनी करावा. त्यासाठी त्यांना आवश्यक उपकरणे आपण चांदा ते बांदा योजनेखाली देण्याचे नियोजन केले आहे. एस.आर. आय भात लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी अनुदानाच्या रुपाने शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दिले. जेणेकरुन शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.

कोकम, जांभूळ आणि करवंदाची झाडे लावण्?यात यावी. नारळापासून निरा उत्पादन करण्यामध्ये खूप फायदा आहे. तरी शेतकऱ्यांनी निरा उत्पादन करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजना समजून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने २0१६-१७ खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक उत्पादन स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या शेतकरी सुषमा सावंत, सुरेश खरजुवेकर, अकुश परब यांचा शाल श्रीफळ व प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच बॉयोगॅस निर्मिती मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या कुडाळ तालुक्यातील ग्रामसेवकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.

Web Title: Deepak Kesarkar tried to take the average yield of rice production to 100 quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.