दारु विक्रीपरवाना प्रकरणात महिलेस धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी
By Admin | Published: July 25, 2016 12:27 AM2016-07-25T00:27:29+5:302016-07-25T00:39:34+5:30
घटनेबाबत गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले
आशपाक पठाण , लातूर
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मुबलक औषधे नसतानाही विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा पूर्ण करण्यात आला़ वरिष्ठांच्या आदेशानुसार उपक्रमाचा मोठा गाजावाजा करून आशा कार्यकर्तींसह कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वितेसाठी तज्ज्ञांनी सल्ले दिले खरे, पण अतिसारच्या रुग्णांना देण्यात येणारी औषधीच संबंधितांकडे नसल्याने कर्मचाऱ्यांना तोंडघशी पडावे लागत आहे़
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे दरवर्षी अतिसारच्या रुग्णसंख्येत वाढ होते़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ११ ते २३ जुलैदरम्यान अतिसार विशेष पंधरवडा राबविला़ या उपक्रमाचा मोठा गाजावाजा करून आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकांना बैठक घेऊन मोहिमेंतर्गत राबविण्यात येणारी सर्व प्रक्रिया तज्ज्ञांमार्फत सांगण्यात आली़ लहान बाळांना अतिसार झाल्यास ओआरएस आणि झिंक दोन्हीही जरून द्या, अतिसाराच्या काळात दूध, पातळ पदार्थ व खाद्य सुरू ठेवा, अतिसार बरा झाला तरीही १४ दिवस झिंकची मात्रा द्या, जेवणाआधी साबणाने हात धुवा, असा संदेश गावोगावी पोहोचविण्यात आला़ अतिसार झालेल्या रुग्णांना आरोग्य कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रात ओआरएस आणि झिंक ही औषधे मोफत दिली जातील, असा प्रचार करण्यात आला़ अतिसार पंधरवडा पूर्ण झाला तरीही औषधांचा पुरवठा झाला नाही.