जमीन संपादन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
By admin | Published: July 8, 2014 12:39 AM2014-07-08T00:39:33+5:302014-07-08T00:43:22+5:30
रेडी पर्यायी रस्त्याबाबत ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी : कनयाळ येथील तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्त्यामधून घरे व मंदिरे जात असल्याने रेडी बंदर पर्यायी रस्तासाठी करण्यात आलेले जमिनीचे संपादन प्रस्ताव रद्द करणे याबाबत बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी येथील प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना निवेदन दिले. जमीन सर्व्हेमध्ये फरक आल्यास पुन्हा सर्व्हे करून,असे आश्वासन यावेळी तहसीलदार इनामदार यांनी दिले.
तेरेखोल रस्ता ते रेडी बंदर पर्यायी रस्ता काढल्यावेळी या शेतकऱ्यांचा जमिनीचा सर्व्हे करताना सर्व्हे अधिकारी यांनी प्रत्यक्ष जमिनींवर न जाता आॅफिसमध्ये बसूनच सर्व्हे केला आहे. त्यामुळे सर्व्हे केलेल्या चुकीचा असून शेतकऱ्यांची काही घरे जात आहेत.
तसेच काही मंदिरे जात आहेत. रेडी बंदराक डे जाण्यासाठी अन्य रस्तेही असून नवीन रस्त्याची गरज नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या रस्त्याचा वापर करूनच रेडी पोर्ट यांनी गेल्या पाच वर्षात क्षमतेपेक्षा जास्त मालाचा निर्यात केलेली आहे. यावरून रेडी बंदराचा विकास झाला नाही, हे सिध्द होते. परंतु आताच हा पर्यायी रस्ता का, असा प्रश्नही निवेदनात उपस्थित केला आहे.
हा पर्यायी रस्ता १५० शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात असल्याने त्यामध्ये १२ घरे व मंदिरे जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हे करताना त्यांना ज्या नोटिसा बजावल्या होत्या, त्या तारखेला सर्व्हे अधिकारी यांनी अचानक बदल करून शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा न बजावता थेट कार्यालयात बसून याबाबत सर्व्हे केला, असे या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी यादीपेक्षा जास्त गेल्या आहेत. याबाबत पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी रेडी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जमीन मोजणीची नोटीस द्यावी, अशीही मागणी आहे.
उपविभागीय अधिकारी यांना २९ जानेवारी २०१४ रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व्हे नंबरमध्ये झालेले सीमांकन दाखविण्याची विनंतीही केली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर महसूल अधिकारी यांनी पाहणी केली होती.
यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी संपादनात जाणाऱ्या सर्व्हे नंबरचे पुनश्च सीमांकन करून घेण्यासाठी आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत पुनश्च सीमांकन झालेले नाही. या सर्व बाबी निवेदनात मांडून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बापू शंभा सातळी, कृष्णा मराठे, प्रमोद राऊळ, दत्तात्रय कामत, पांडुरंग कनयाळकर, मधुकर कांबळी, सरपंच सुरेखा कांबळी आदी उपस्थित होते.
गेल्या ५ वर्षात या भागाचा विकास करता आला नाही. मग आता या पर्यायी रस्त्याने विकास होणार काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच माऊली मंदिर ते जेटी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, या रस्त्याकडे दुर्लक्ष करता पर्यायी रस्ता का व्हावा, असाही सवाल उपस्थित केला
आहे. (वार्ताहर)