शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:57 AM2019-03-06T11:57:16+5:302019-03-06T12:01:26+5:30
पुणे येथील प्रा. नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात असे आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन प्रा. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वेंगुर्ले : पुणे येथील प्रा. नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही संबोधून काम न करता पगार उचलतात असे आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींनी वेंगुर्ले पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन प्रा. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्वत:ला प्राध्यापक म्हणवणारे व खासगी क्लासेस चालवणारे प्रा. नामदेव जाधव (रा. पुणे-देहू रोड) यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षकांना देशद्रोही म्हणत ते काम न करता पगार उचलतात, असे बेताल वक्तव्य केले होते.
त्यामुळे समस्त शिक्षकांमध्ये रागाची भावना व नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. जाधव यांच्यावर भा.द.वि नुसार योग्य ती कलमे लावून लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी दिलीप प्रभुखानोलकर, शंकर वजराटकर, प्रसाद जाधव, रामचंद्र्र झोरे, एकनाथ जानकर, सुनील गोंधळी, संदीप कडू, मनोज बहिरम, विजय मस्के, संतोष काकडे, सीताराम नाईक, तानाजी शिंगाडे आदी उपस्थित होते.