त्या जागेवर गार्डन करण्याची मागणी, देवगड नेनेनगरवासीयांचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 03:43 PM2021-07-03T15:43:39+5:302021-07-03T15:45:15+5:30

Shiv Sena Sindhudurg : शिवसेनेने नेनेनगर पाणीसाठवण टाकीजवळील कचरा प्रश्नावरून केलेल्या २३ जूनच्या आंदोलनावेळी ८ दिवसामध्ये कचरा प्रकल्प हटविण्याचे आश्वासन नगरपंचायतीमार्फत देण्यात आले होते. याची पूर्तता नगरपंचायत प्रशासनाने केल्याने कचरा प्रकल्पाच्या जागेवर ग्रामस्थ व‍ शिवसेनेने रांगोळी काढून प्रशासनाचे आभार मानले आहेत. या जागेवर गार्डन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी केली आहे.

Demand for a garden on that place, the problem of Devgad Nenenagar residents was solved | त्या जागेवर गार्डन करण्याची मागणी, देवगड नेनेनगरवासीयांचा प्रश्न सुटला

नेनेनगर येथे कचरा प्रकल्प हटविलेल्या ठिकाणी रांगोळी काढून प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देत्या जागेवर गार्डन करण्याची मागणी, देवगड नेनेनगरवासीयांचा प्रश्न सुटला कचरा प्रकल्प हटविण्याचा शब्द प्रशासनाने पाळला

देवगड : शिवसेनेने नेनेनगर पाणीसाठवण टाकीजवळील कचरा प्रश्नावरून केलेल्या २३ जूनच्या आंदोलनावेळी ८ दिवसामध्ये कचरा प्रकल्प हटविण्याचे आश्वासन नगरपंचायतीमार्फत देण्यात आले होते. याची पूर्तता नगरपंचायत प्रशासनाने केल्याने कचरा प्रकल्पाच्या जागेवर ग्रामस्थ व‍ शिवसेनेने रांगोळी काढून प्रशासनाचे आभार मानले आहेत. या जागेवर गार्डन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ व शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी केली आहे.

यावेळी विभाग प्रमुख तुषार पेडणेकर म्हणाले कि, देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये अशी चुकिची व निकृष्ट दर्जाच्या कामांच्या विरोधात आवाज उठवुन योग्य प्रकारे कामे करण्यास देवगड-जामसंडे नगरपंचायतीला भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय अध्यक्ष तुषार पेडणेकर,बुवा तारी स्वप्नील राणे,कांबळी, व नेने नगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

रांगोळी काढून आभार मानले

देवगड नेनेनगर पाणी साठवण टाकीजवळ नगरपंचायतीमार्फत कचरा टाकण्यात येत होता. याबाबत शिवसेनेने नागरिकांच्या मागणीनुसार हा प्रकल्प हटवावा अशी मागणी देवगड जामसंडे नगरपंचायतीकडे निवेदनाव्दारे करण्यात आली होती. तसेच आठ दिवसात कचरा न हटविल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र यावर नगरपंचायतीने वेळीच कार्यवाही करुन तेथील कचरा हटवून आश्वासनाची पुर्तता केल्यामुळे तेथील ग्रामस्थ व शिवसेनेच्यावतीने रांगोळी काढुन नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत.


 

Web Title: Demand for a garden on that place, the problem of Devgad Nenenagar residents was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.