कारखाना सील करण्याची मागणी; नागरिकांच्या आरोग्यास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:23 PM2020-05-24T16:23:24+5:302020-05-24T16:27:39+5:30
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रासायनिक कंपन्या आहेत. शिवाय फार्मा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. तसेच खासगी रुग्णालयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रासायनिक कंपन्या, फार्मा कंपन्या व रुग्णालयातील वेस्टेज मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सध्या गोव्यातील कंपनी व्यवस्थापनासमोर आहे.
दोडामार्ग : आरोग्यास घातक असलेल्या रासायनिक व जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारा माटणे भोम येथील कारखाना नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असल्याने तो सील करावा, अशी मागणी आयी व माटणे ग्रामपंचायतींतर्फे तहसीलदारांकडे करण्यात आली. तसे पत्रही प्रशासनास दिले असून त्यासोबत कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी करून घालण्यात आलेली पंचयादी सादर करण्यात आली आहे.
गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या रासायनिक कंपन्या आहेत. शिवाय फार्मा कंपन्यांची संख्याही मोठी आहे. तसेच खासगी रुग्णालयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या रासायनिक कंपन्या, फार्मा कंपन्या व रुग्णालयातील वेस्टेज मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सध्या गोव्यातील कंपनी व्यवस्थापनासमोर आहे. गोव्यातील केमिकल व जैविक कचºयाच्या विल्हेवाटीसाठी तेथील नागरिकांचा विरोध आहे. वाढत्या नागरीकरणामुळे या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तेथील घातक केमिकल, रासायनिक द्रव पदार्थ व इतर जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात आणून रात्रीच्या वेळी त्याची विल्हेवाट लावली जाते.
सध्या आयी व माटणे गावांच्या सीमेवरील कृष्णा राघोबा सडेकर यांच्या प्लांटमध्ये हा जैविक कचरा आणून त्याची विल्हेवाट लावली जाते. या प्लांटला माटणे ग्रामपंचायतीने रासायनिक साहित्याच्या टाक्या साफसफाई करण्यासाठी ना हरकत दाखला दिला होता. मात्र, ज्या कामाची परवानगी घेतली त्या व्यतिरिक्त दुसरेच काम केले जात आहे. याठिकाणच्या कचºयात मानवी शरीरास घातक असणारे केमिकल व इतर जैविक कचºयाचा समावेश आहे. हा कचरा रात्री जाळला जातो. मात्र, त्यापासून निर्माण झालेला धूर मानवी आरोग्यास घातक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सर्व प्रकरणाचा उलगडा होणे गरजेचे
कचºयाची विल्हेवाट लावतेवेळी साधारण एक किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असेल तर हा प्लांट त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याविरोधात माटणे व आयी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत विरोधाचा एल्गार
पुकारला होता. त्याची दखल दोन्ही ग्रामपंचायतींनी घेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आक्षेपार्ह साहित्य, रासायनिक द्रव पदार्थ , प्लास्टिक कचरा, विविध प्रकारची केमिकल पावडर आढळून आली. लगेच पंचनामा करून पंचयादीची प्रत जोडत ही कारखानावजा इमारत सील करण्याची मागणीवजा पत्र तहसीलदारांना देण्यात आले.
सिंधुफोटो ०१
कारखान्यातील रासायनिक व जैविक कचरा असा टाकण्यात आला आहे.