मळेवाडमध्ये वाहतूक बंद, कॉजवेवरील उंची वाढवावी, अशी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:31 PM2019-07-24T12:31:00+5:302019-07-24T12:32:21+5:30

जोरदार पावसामुळे मळेवाड-भटवाडी कॉजवेवर पाणी आल्याने पूर्ण दिवस कॉजवेवरील वाहतूक बंद होती. या कॉजवेवरील उंची वाढवावी, अशी वारंवार मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते.

Demand for traffic closure, increase of causeway height in Malevad | मळेवाडमध्ये वाहतूक बंद, कॉजवेवरील उंची वाढवावी, अशी मागणी

पावसामुळे मळेवाड-भटवाडी कॉजवेवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.

Next
ठळक मुद्देमळेवाडमध्ये वाहतूक बंदकॉजवेवरील उंची वाढवावी, अशी मागणी

आरोंदा : जोरदार पावसामुळे मळेवाड-भटवाडी कॉजवेवर पाणी आल्याने पूर्ण दिवस कॉजवेवरील वाहतूक बंद होती. या कॉजवेवरील उंची वाढवावी, अशी वारंवार मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते.

शुक्रवारी मळेवाड परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे सकाळपासूनच भटवाडी कॉजवेवर पाणी आले होते. त्यामुळे भटवाडीतील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी भटवाडी-शिरसाटवाडी किंवा वरची मळेवाड खेमराज पुलाचा आधार घ्यावा लागला.

पावसाळ््यात मळेवाड नदीला वारंवार पूर येत असल्याने भटवाडी व राणेवाडी कॉजवेवर पाणी असते. त्यामुळे या दोन्ही वाड्यांतील लोकांना मुख्य रस्त्यावर येण्यास अडथळा निर्माण होतो. या कॉजवेची उंची वाढवून दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
 

Web Title: Demand for traffic closure, increase of causeway height in Malevad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.