अज्ञाताकडून कणकवली पर्यटन सुविधा केंद्राची तोडफोड, साहित्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 01:23 PM2021-12-01T13:23:49+5:302021-12-01T13:25:14+5:30

कोविड काळात या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये कणकवली नगरपंचायतने अद्यायावत असे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला होता.

Demolition of Kankavali Tourism Facility Center by unknown persons | अज्ञाताकडून कणकवली पर्यटन सुविधा केंद्राची तोडफोड, साहित्याचे नुकसान

अज्ञाताकडून कणकवली पर्यटन सुविधा केंद्राची तोडफोड, साहित्याचे नुकसान

Next

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या मुडेश्वर मैदानाजवळील पर्यटन सुविधा केंद्राच्या एका खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने आतील साहित्याची नासधूस केली. हा प्रकार आज, बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात समाजकंटकांकडून हा प्रकार करत असताना या खोलीतील गाद्या व बेडचे नुकसान करण्यात आले आहे. मात्र या खोलीतील काहीही साहित्य चोरीस गेले नसल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

अज्ञातांकडून पर्यटन सुविधा केंद्राच्या मुख्य दरवाज्याचेही कुलूप दगडाद्वारे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये कणकवली नगरपंचायतने अद्यायावत असे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला होता. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर  नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्याच्या सूचना नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यामुळे या कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्यात करीता कर्मचारी गेले असता तेथे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, नगरपंचायतीच्या पर्यटन सुविधा केंद्राची अशी तोडफोड करण्यामागे नेमका उद्देश काय? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात  आहे. तसेच पोलिसांनी संबंधित समाजकंटकांचा शोध घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतीत रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी ठेवण्यात आलेले अनेक साहित्य आहे. मात्र, मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप फुटले नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Demolition of Kankavali Tourism Facility Center by unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.