वेंगुर्लेमधील नवाबाग मांडवी खाडीत वेंगुर्ले पोलिसांची प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:54 IST2021-06-13T12:51:32+5:302021-06-13T12:54:18+5:30
Rain Vengurla Sindudurg : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत "बचाव कार्याचे प्रात्यक्षिक" घेण्यात आले.

वेंगुर्लेमधील नवाबाग मांडवी खाडीत वेंगुर्ले पोलिसांची प्रात्यक्षिक
वेंगुर्ला : हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शनिवारी सायंकाळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वेंगुर्ला नवाबाग मांडवी खाडीत "बचाव कार्याचे प्रात्यक्षिक" घेण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव गवरी, विजय कुंडेकर, हेड कॉन्स्टेबल वासुदेव परब, परूळेकर, रमेश तावडे, पोलीस नाईक दादा परब, नितीन चोडणकर, खडपकर, परशुराम सावंत, तसेच होमगार्ड गिरप, केळुसकर आदी सहभागी झाले होते.
वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अतिवृष्टी काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.