साकेडी येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:41 PM2019-12-25T15:41:52+5:302019-12-25T15:42:48+5:30

साकेडी तांबळवाडी येथील श्रद्धा अनंत परब ( ५८) या ताप येत असलेल्या महिलेचा रक्त नमुना डेंग्यू सदृश्य आला आहे. तिच्या शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने तिला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Dengue-like patient found in Sakadi | साकेडी येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडला

साकेडी येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडला

Next
ठळक मुद्देसाकेडी येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडलाकणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

कणकवली : साकेडी तांबळवाडी येथील श्रद्धा अनंत परब ( ५८) या ताप येत असलेल्या महिलेचा रक्त नमुना डेंग्यू सदृश्य आला आहे. तिच्या शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी झाल्याने तिला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

साकेडी तांबळवाडी येथील श्रद्धा परब हिला गेले काही दिवस ताप येत होता. रविवारी तिला अस्वस्थ वाटू लागले तसेच तिच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या ३८ हजारपर्यंत कमी झाली होती. तिचा रक्तनमुना तपासणी अंती डेंग्यू सदृश्य आला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ तिला कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाला या घटनेबाबत माहिती समजताच त्यांनी साकेडी तांबळवाडीसह इतर परिसरात ४८ घरांचा सर्व्हे केला. अजून कोणाला ताप येत आहे का ? याबाबत माहिती घेण्यात आली. तसेच पूर्वी सर्दी, ताप आलेल्या पाच व्यक्तींचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बुधवारी डेंग्यूच्या डासांना प्रतिबंध करण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी देखील करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

तांबळवाडीमध्ये यापूर्वीही दोन रुग्ण डेंग्यू सदृश मिळाले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते आता पूर्णत: बरे झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तांबळवाडी परिसरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येणार असून ताप येत असलेल्या रुग्णांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले.

Web Title: Dengue-like patient found in Sakadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.