पशुसंवर्धन विभाग १६ योजना राबविणार

By admin | Published: May 20, 2015 09:54 PM2015-05-20T21:54:19+5:302015-05-21T00:09:47+5:30

रणजित देसाई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद दुग्धविकास समितीची सभा

Department of Animal Husbandry will implement 16 schemes | पशुसंवर्धन विभाग १६ योजना राबविणार

पशुसंवर्धन विभाग १६ योजना राबविणार

Next

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेतून ४ व जिल्हा परिषद सेस अनुदानातून १२ अशा एकूण १६ योजना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार आहेत. यासाठी १ कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १ ते ३० जूनपर्यंत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सभेत केले.जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य धोंडू पवार, दिलीप रावराणे, आत्माराम पाळेकर, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. एस. के. चंदेल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १९ योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकडील दुभत्या जनावरांपैकी भाकड जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करणे या योजनेसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, २०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. ५० टक्के अनुदानावर खाद्याचा पुरवठा करणे- तरतूद ७ लाख, एकात्मिक कुक्कुट विकास योजनेंतर्गत एक दिवसीय १०० पिलांचा पुरवठा करणे- १२ लाख, वैरण विकास योजना- १५ लाख, ७५ टक्के अनुदानावर शेळी गट पुरविणे- १२ लाख, ४० टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे- ४० लाख, ९० टक्के अनुदानावर फॅट मशीनचा पुरवठा करणे- ५ लाख, ७५ टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा करणे- ५ लाख, १०० टक्के अनुदानावर पशुपालकांना प्रशिक्षण देणे- १ लाख, १०० टक्के अनुदानावर सकस चारा निर्मितीसाठी अर्थसाहाय्य करणे- २ लाख ५० हजार, महिलांना सबलीकरणासाठी ९० टक्के अनुदानावर सुधारित जातीच्या २ आठवडे वयाच्या ५० कुक्कुट
पिलांचा पुरवठा करणे- ४ लाख ५० हजार, ९० टक्के अनुदानावर दुधाची किटली, घमेले व फावडे यांचा पुरवठा करणे- ४ लाख ५० हजार, ९० टक्के अनुदानावर मूरघास तयार करण्याच्या बॅगचा पुरवठा करणे- १ लाख ८० हजार, ७५ टक्के अनुदानावर रबरी मॅटचा पुरवठा करणे- ३ लाख ७५ हजार, ७५ टक्के अनुदानावर हायड्रोकोनिक चारा निर्मितीसाठी अर्थसहाय्य- ३ लाख तर ७५ टक्के अनुदानावर लघुअंडी उबवणी यंत्राचा पुरवठा करणे- ३ लाख अशा प्रथम चार योजना जिल्हा वार्षिक योजनेतून तर १२ योजना जिल्हा परिषद अनुदानातून राबविण्यात येत आहेत. यासाठी १ ते ३० जून या कालावधीत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी मंगळवारी पशुसंवर्धन समिती सभेत केले आहे. जिल्ह्यातील ४२ संस्थांना फॅट मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे, तर उर्वरितांना चालू वर्षी मशीन देणार असल्याचेही देसाई यांनी सभेत सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Department of Animal Husbandry will implement 16 schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.