उपअभियंता रंगेहाथ जाळ्यात

By admin | Published: November 20, 2015 09:00 PM2015-11-20T21:00:49+5:302015-11-21T00:15:33+5:30

लाचलुचपत विभागाची कारवाई : बिल काढण्यासाठी साडेसतरा हजारांची मागणी

Deputy Engineer | उपअभियंता रंगेहाथ जाळ्यात

उपअभियंता रंगेहाथ जाळ्यात

Next

सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता राजन पांडुरंग पाटील (वय ४८, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) याला सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाने साडेसतरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही तक्रार दोडामार्ग येथील ठेकेदार अनिल गवस यांनी केली होती. त्याप्रमाणे गुरूवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये ही कारवाई केली आहे.
राजन पाटील यांच्याकडे सावंतवाडीसह दोडामार्ग या दोन तालुक्यांचा कार्यभार आहे. तक्रारदार अनिल गवस यांनी तेरवण-मेढे येथील समाज मंदिराचे व सोनावल येथे कंपाऊंड वॉलचे काम घेतले होते. ही कामे पूर्ण होऊन सात ते आठ महिने पूर्ण झाले होते. मात्र, या कामाचे बिल देण्यास राजन पाटील हा सतत टाळाटाळ करीत असे. बिलासाठी गवस हे दोडामार्ग येथून सतत सावंतवाडी येथील कार्यालयात येत असत. पण त्यांना दररोज वेगवेगळी उत्तरे देत असे. त्यामुळे संतापलेल्या अनिल गवस यांनी १७ आॅक्टोबरला सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाकडे राजन पाटील यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खातरजमा केली. यावेळी राजन पाटील हा खरोखरच पैसे मागत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरूवारी सकाळपासूनच राजन पाटील यांच्या मार्गावर लाचलुचपत विभागाचे अधिकारी होते. अनिल गवस याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पाटील याला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. त्यावेळी त्याने आपण मांगेली येथे असल्याचे गवस यांना सांगितले. त्यानंतर सतत तीन ते चार वेळा गवस यांनी पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण पाटील याने आपणास वेळ लागणार, रात्री भेटूया, अशी उत्तरे दिली होती.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मागदर्शनाखाली उपअधीक्षक मुकुंद हातोटे यांनी सहकाऱ्यांसह केली. (प्रतिनिधी)

रंगेहाथ पकडले : रात्री साडेदहाला कारवाई
राजन पाटील हा सायंकाळी दोडामार्गवरून आला. त्यानंतर तो रात्रीच्या वेळी भाऊबीजेसाठी सावंतवाडी पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्याचवेळी त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत अनिल गवस याला भ्रमध्वनीवरून संपर्क करत पोलीस लाईनमध्ये ये, मी तेथे आहे, असे सांगितले. त्यानुसार रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांसह तक्रारदार पोलीस लाईनमध्ये गेले. तेथे पाटील हा बहिणीच्या घरातून बाहेर येऊन स्वत:च्या गाडीजवळ थांबला होता. तेथे तक्रारदाराने १७ हजार ५०० रूपयांची लाच देताना त्याला रंगेहाथ पकडले आणि लाचलुचपतचा सापळा यशस्वी झाला. पाटील याला पकडल्यानंतर विश्रामगृहात आणण्यात आले. तेथे त्याच्यावर अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा तसेच इतर कागदपत्रे पूर्ण करीत शुक्रवारी सकाळी पाटील याला ओरोस येथे नेण्यात आले.

पाटीलच्या राहत्या फ्लॅटवर छापा
मी वैतागलो होतो : गवस
राजन पाटील याला पकडून देणारा ठेकेदार अनिल गवस याने सांगितले की, मी तेरवण मेढ्याचे काम पूर्ण करून आठ महिने झाले होते. मात्र, मला पैशासाठी नेहमी ये-जा करावी लागत असल्याने मी वैतागलो होतो. त्यामुळेच हे शेवटचे पाऊल उचलावे लागले, असे मत गवस यांनी व्यक्त केले.

पाटीलच्या राहत्या फ्लॅटवर छापा
मी वैतागलो होतो : गवस
राजन पाटील याला पकडून देणारा ठेकेदार अनिल गवस याने सांगितले की, मी तेरवण मेढ्याचे काम पूर्ण करून आठ महिने झाले होते. मात्र, मला पैशासाठी नेहमी ये-जा करावी लागत असल्याने मी वैतागलो होतो. त्यामुळेच हे शेवटचे पाऊल उचलावे लागले, असे मत गवस यांनी व्यक्त केले.
पाटील हा सबनीसवाडा भागात एका फ्लॅटमध्ये राहत होता. त्या फ्लॅटवर पहाटे तीनच्या सुमारास लाचलुचपत विभागाने छापा टाकला. मात्र, या फ्लॅटमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही.
पाटील हा मूळचा आचरा (ता.मालवण) येथील असून, मुलगा कोल्हापूर येथे शिक्षणानिमित्त असल्याने पत्नीही तेथेच असते.

पाटील याला पोलीस लाईनमध्ये पकडल्यानंतर त्याला सावंतवाडी विश्रामगृहात आणण्यात आले. ही बातमी पसरल्यानंतर अनेक ठेकेदार व पक्षाचे पदाधिकारी सावंतवाडी विश्रामगृहात दाखल झाले. विश्रामगृहावर एकच गर्दी झाली होती.

Web Title: Deputy Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.