वैभववाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक, पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात, २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 20, 2023 07:10 PM2023-04-20T19:10:14+5:302023-04-20T19:10:35+5:30

गुन्हा दाखल न करण्याकरीता ४० हजार रूपयांची लाचेची मागणी

Deputy Inspector of Vaibhavwadi Police Station, Police Naik arrested while accepting bribe of 20 thousand | वैभववाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक, पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात, २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

वैभववाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक, पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात, २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

googlenewsNext

सिंधुदुर्ग : वैभववाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रारदाराच्या विरोधात ३७६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो म्हणून सांगून गुन्हा दाखल न करण्याकरीता ४० हजार रूपयांची लाच मागितली होती. यातील २० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील व पोलिस नाईक मारूती साखरे यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलिस दलातील भ्रष्टाचारदेखील समोर आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना एसीबीने ताब्यात घेत अटक केली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्याविरोधात ३७६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून तक्रारीच्या चौकशी दरम्यान त्यांच्याकडे ४० हजार रूपयांची मागणी केली. मात्र, तडजोड करत ३० हजारांची रक्कम ठरली. त्यातील २० हजार रूपये स्वीकारताना संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील व पोलिस नाईक मारूती साखरे हे रंगेहाथ पकडले गेले. ही कारवाई आज, गुरूवारी दुपारी वैभववाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलिस हवालदार जर्नादन रेवंडकर, नितेश परब, रविकांत पालकर, जितेंद्र पेडणेकर, अजित खंडे. प्रथमेश पोतनीस, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भागर्व पाले, कांचन प्रभू आदींच्या पथकाने ही धडक कारवाई केली. 

Web Title: Deputy Inspector of Vaibhavwadi Police Station, Police Naik arrested while accepting bribe of 20 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.