मसापच्या कोकण विभागातून देशपांडे विजयी

By admin | Published: March 16, 2016 11:59 PM2016-03-16T23:59:35+5:302016-03-17T00:05:51+5:30

विभागातील एकूण ३५४ मतदारांपैकी रायगड जिल्ह्यात २८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ३०३ मतदार होते

Deshpande won from Konkan region of Mesapar | मसापच्या कोकण विभागातून देशपांडे विजयी

मसापच्या कोकण विभागातून देशपांडे विजयी

Next

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोकण विभागातून परिवर्तन पॅनलचे प्रकाश देशपांडे यांनी नवनिर्माण पॅनलचे प्रा. सुहास बारटक्के यांचा ११ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. मराठी साहित्य परिषदेच्या ३२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोकण विभागातून एका जागेसाठी मतदान पार पडले. विभागातील एकूण ३५४ मतदारांपैकी रायगड जिल्ह्यात २८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ३०३ मतदार होते. मंगळवारच्या मतमोजणीत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून ३५४ मतदारांपैकी २८९ मतदारांनी मतदान केले. त्यातील १२ मते बाद झाल्याने देशपांडे यांना २४३ तर बारटक्के यांना २३२ मते मिळाली. (वार्ताहर)

Web Title: Deshpande won from Konkan region of Mesapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.