तोतया पोलीस अधिकाऱ्याला पकडले

By admin | Published: November 26, 2015 10:43 PM2015-11-26T22:43:37+5:302015-11-27T00:12:05+5:30

सायबर कॅफे चालकाची फसवणूक : आठ दिवसांपासून आहे मालवणात

The detained caught the police officer | तोतया पोलीस अधिकाऱ्याला पकडले

तोतया पोलीस अधिकाऱ्याला पकडले

Next

मालवण : ‘पोलीस अधिकारी आहे’ अशी बतावणी करून मालवण शहरातील एका सायबर कॅफे चालकाची फसवणूक करणाऱ्या तोतया पंकज रवींद्र्र प्रभू (३०, रा. काळसे-धामापूर) याला मालवण पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. मालवण एसटी स्थानकानजीक सिताई कॉम्प्लेक्स मधील योगक्षेम ट्रेडर्सचे मालक योगेश पटकारे यांनी या प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली असून संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्थानकाचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीप्रसंगी पंकज याने पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पटकारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंकज प्रभू हा आठ दिवसांपूर्वी मालवण येथे आला. त्याने सिताई कॉम्प्लेक्स येथील योगेश पटकारे यांच्या सायबर कॅफेमध्ये येत आपण पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आहोत. जिल्हा पोलीस दलात आपण रुजू झालो आहोत. तसेच दोडामार्ग येथे कार्यरत आहोत. एक डिसेंबरपासून मालवण पोलीस ठाण्यात आपण रुजू होणार आहे. असे सांगून आपल्याला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याची परीक्षा द्यावयाची आहे. त्यासाठी आपल्या कॅफेत इंटरनेटचा वापर करण्याची परवानगी मागितली. मालक पटकारे यांनी ही व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याने त्याला सहकार्याच्या भावनेतून विश्वास ठेवला. तो गेले आठ दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात योगक्षेम ट्रेडर्स कॅफेमध्ये संगणकाचा वापर करायचा.
यावेळी प्रभू यांनी आपण पोलीस अधिकारी आहोत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे गोपनीय काम करत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

उलट तपासणी : खाकीचा दम मिळताच कबुली
गुरुवारी दुपारी ३ वाजता पोलीस स्थानकाचे गोपनीय पोलीस कर्मचारी रुपेश सारंग हे सायबर कॅफे तपासणीसाठी योगक्षेम ट्रेडर्स येथे आले. यावेळी त्यांनी चौकशी केली असता या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर सारंग यांनी त्याची उलटतपासणी करत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी प्रभू हा तोतया पोलीस असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसी खाकीचा दम मिळताच त्याने आपण पोलीस नाही. एका कंपनीत आहोत, धामापूर येथे घर आहे. मात्र, त्या माहितीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता त्यातही सत्यता आढळून आली. त्यानंतर पटकारे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

Web Title: The detained caught the police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.