कणकवली नगरपंचायतीला मुख्यमंत्र्यांकडून विकासनिधी

By admin | Published: March 23, 2017 04:36 PM2017-03-23T16:36:07+5:302017-03-23T16:36:07+5:30

उपनगराध्यक्ष कन्हैय्या पारकर यांची माहिती

Development Fund from Chief Minister of Kankavli Nagapanchayat | कणकवली नगरपंचायतीला मुख्यमंत्र्यांकडून विकासनिधी

कणकवली नगरपंचायतीला मुख्यमंत्र्यांकडून विकासनिधी

Next


कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली नगरपंचायतीला सव्वादोन कोटी रुपयांचा विकासनिधी दिल्याची माहिती उपनगराध्यक्ष कन्हैय्या पारकर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत हा सव्वा दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याची माहिती पारकर यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात हा निधी मंजूर झाला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना यासाठी मोठा प्रयत्न केल्याची माहितीही यावेळी पारकर यांनी दिली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केल्याची माहिती पारकर यांनी दिली. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेउन शहरातील रस्ते, वीज, गटारे आदी दर्जेदार नागरी सुविधांवर हा विकास निधी खर्च करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, नगरसेवक सुशांत नाईक, राजश्री धुमाळे, रुपेश नॉर्वेकर, भाजपाचे शहर प्रभारी भाई परब आदी उपस्थित होते.

Web Title: Development Fund from Chief Minister of Kankavli Nagapanchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.