मालवणच्या हितासाठीच विकास आराखडा हवा

By admin | Published: September 3, 2015 11:28 PM2015-09-03T23:28:01+5:302015-09-03T23:28:01+5:30

वैभव नाईक : बसस्थानक येथील वॉटर फिल्टरचेही लोकार्पण

Development plan should be developed for the benefit of Malaviya itself | मालवणच्या हितासाठीच विकास आराखडा हवा

मालवणच्या हितासाठीच विकास आराखडा हवा

Next

मालवण : शहर विकास आराखडा कोणत्याही परिस्थितीत जनतेवर लादला जाणार नाही. आराखडा इंग्रजीमधून असल्याने मराठीत उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार आहेत. मात्र, नगरपरिषद तसेच शासनाने बिल्डर लॉबी व आर्थिक लागेबांधे न पाहता हरकती नोंदवून घ्याव्यात. जनतेच्या मतानुसार विकास आराखड्यात बदल करण्यासाठी शिवसेना शहरवासीयांच्या पाठीशी राहून हरकती नोंदविण्यासाठी सहकार्य करणार आहे, अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी बोलताना स्पष्ट केली.
गत महिन्यातील आपल्या मालवण दौऱ्यात त्यांनी एस. टी.स्थानक परिसराला भेट दिली होती. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न लक्षात येताच स्वखर्चातून बसवलेल्या वॉटर फिल्टरचे लोकार्पण माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक अजय पाटील उपस्थित होते. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नंदू गवंडी, नगरसेविका सेजल परब, रविकिरण आपटे, सन्मेश परब, दीपा शिंदे, गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, चारुशीला आचरेकर, मेघा सावंत, श्रीराम गावकर, प्रमोद राणे, प्रवीण लुडबे, बाबू मांजरेकर, किशोर गावकर, सुधीर चिंदरकर, किरण वाळके, पराग खोत, सोमनाथ लांबोर उपस्थित होते. नाईक म्हणाले, शहरवासियांचा विचार न करता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर जनतेसाठी हरकती घेण्यासाठी दिलेली मुदतही अपुरी आहे. ती मुदत वाढवून मिळण्यासाठी, तसेच आराखडा मराठीत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा आराखडा मराठीत असला तर त्यावर हरकती मांडणे सोपे जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

बंदर जेटीचे सुशोभिकरण होणार
मालवण बंदर जेटीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. स्थानिक होडी चालक व व्यावसायिक मच्छिमार यांना विश्वासात घेऊन अद्ययावत जेटी बनवली जाणार असून, सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांचा आराखडा बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आर्किटेक्ट नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी होडी व्यावसायिकांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील पंचधातू ध्वजाची नव्याने उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान, किल्ले होडी सेवा पर्यटन हंगाम सुरु झाला तरी बंदर विभागाची आयव्ही तपासणी न झाल्याने रखडली आहे. याबाबत प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांची चर्चा करून तपासणी होईपर्यंत या व्यावसायिकांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.

हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई नको
देवबाग तारकर्ली येथील अनधिकृत बांधकामांवर महसूलने फौजदारी गुन्हे दाखल केले. याबाबत पोलिसांचे पंचनामे सुरु झाले आहेत. असे असले तरी एकाही स्थानिक व्यावसायिकांवर शहानिशा केल्याशिवाय कारवाई होणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

Web Title: Development plan should be developed for the benefit of Malaviya itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.