ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास

By admin | Published: June 5, 2016 10:28 PM2016-06-05T22:28:54+5:302016-06-06T00:41:25+5:30

दीपक केसरकर : तारकर्ली येथे पर्यटन धोरणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक

Development of rural area tourism | ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास

ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास

Next

मालवण : बोटिंग आणि जलक्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी लवकरात लवकर खाड्यांतील गाळ काढला जाणार आहे. गावागावांतील खाड्या विकसित होण्यासाठी ग्रामीण भागाचा पर्यटनातून विकास केला जाणार आहे. केरळच्या धर्तीवर जिल्ह्याचा पर्यटन विकास होण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तारकर्ली येथे इसदाच्या स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे पर्यटन धोरणाबाबत येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाची भूमिका याबाबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मेरीटाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, बंदर विभागाचे कॅप्टन इंगळे, अमोल ताम्हणकर, नितीन वाळके, महेश जावकर, बबन शिंदे तसेच बंदर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत अनुपस्थित होते.
किल्ला होडी सेवा वाहतुकीसाठी निश्चित केलेली हंगाम बंदची तारीख यापुढे पावसाळी वातावरणावरच निश्चित करण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. स्थानिक युवकांना साहसी जलपर्यटनाचे शासनातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात बंदरांच्या विकासाची जबाबदारी मेरीटाईम बोर्डाकडे सोपवलेली आहे. यासाठी आवश्यक ठिकाणी जेटीची उभारणी, प्रमुख बंदरे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रमुख बंदरे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या मेरीटाईम बोर्डाला सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच साहसी जलक्रीडा प्रकारांच्या परवान्यांबाबत एक शिबिराचे आयोजन करण्यात येईल. या शिबिरातून बोटींचे परवाने वितरित करण्यात येतील, असे मेरीटाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांना खडेबोल आणि आभारही
सभेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आणि सभेला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ माझ्यावर आणू देऊ नका, असे खडेबोल सुनावत त्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. तर रात्री नऊ वाजता सुरू झालेली बैठक साडेअकरा वाजेपर्यंत सुरू होती. उशिरा बैठक सुरू होऊनही पालकमंत्र्यांनी आभारही मानले.

Web Title: Development of rural area tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.