विकासाच्या हंड्या फुटायला लागल्या

By Admin | Published: August 26, 2016 08:36 PM2016-08-26T20:36:24+5:302016-08-26T23:16:56+5:30

प्रमोद जठार : वैभववाडी तालुक्यात दहीहंडी उत्सव उत्साहात, काँग्रेस-भाजपकडून आयोजन

The developmental ropes begin to bloom | विकासाच्या हंड्या फुटायला लागल्या

विकासाच्या हंड्या फुटायला लागल्या

googlenewsNext

वैभववाडी : देशात आणि राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर कोकणात विकासाच्या हंड्या फुटायला सुरुवात झाली आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग मंजूर करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वैभववाडी तालुक्याच्या विकासात ‘चारचाँद’ लावण्याचे काम केले आहे. त्याबद्दल तालुकावासियांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील भाजप आणि काँग्रेसची दहीहंडी फोडण्यासाठी वैभववाडी, कणकवली तालुक्यांतील गोविंदा पथकांनी पाच थर लावून सलामी दिली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दहीहंडी उत्सव सुरू होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वैभववाडी शहरात भाजप, काँग्रेस, शिवसेना, बाजारपेठ मित्रमंडळाने दहीहंड्या उभारल्या होत्या. बसस्थानकासमोरील भाजपच्या दहीहंडी उत्सवात आॅर्केस्ट्राने रंगत वाढवली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, उत्तम सुतार, नगरसेवक संतोष माईणकर, आदी उपस्थित होते. त्यावेळी सोनाळीतील पावणादेवी गोविंदा पथकाने पाच थर, तिवरे येथील महापुरुष मित्रमंडळ, गोपाळनगर मित्रमंडळ, वाभवेतील आदिष्टीदेवी मित्रमंडळाने चार थर लावून सलामी दिली. या गोविंदा पथकांना माजी आमदार जठार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले.
काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवात तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता चोरगे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, नासीर काझी, अरविंद रावराणे, बाळा हरयाण, प्रफुल्ल रावराणे, अंबाजी हुंबे, नगरपंचायत सभापती अक्षता जैतापकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


पाच थर लावून सलामी
दत्तमंदिर चौकातील काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवात सोनाळीतील पावणादेवी मित्रमंडळाने पाच थर रचून सलामी दिली. तर कणकवली बाजारपेठ मित्रमंडळासह स्थानिक गोविंद पथकांनी चार थर लावून सलामी दिली. रात्री नांदगाव, साळिस्ते, राजापूर येथील गोविंदा पथकांनी हजेरी लावली. त्यामुळे चोख पोलिस बंदोबस्तात उशिरापर्यंत दहीहंडी उत्सव उत्साहात रंगला होता. तसेच खांबाळे, उंबर्डे, सोनाळी, कोकिसरे, भुईबावडा, आदी गावांमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: The developmental ropes begin to bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.