देवगड सातत्याने अग्रेसर

By Admin | Published: September 23, 2015 10:04 PM2015-09-23T22:04:53+5:302015-09-24T00:10:10+5:30

पंचायत समितीचा नावलौकिक : विजय चव्हाण, मनोज सारंगांच्या प्रयत्नांना यश

Devgad continuously leads | देवगड सातत्याने अग्रेसर

देवगड सातत्याने अग्रेसर

googlenewsNext

अयोध्याप्रसाद गावकर - देवगड  पंचायत समितीने यशवंत पंचायत राज अभियानामध्ये २०१३-१४ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीपैंकी ७१ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्कार मिळविला आहे. तसेच देवगड तालुका भारत स्वच्छ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त होऊन जिल्ह्यामध्ये प्रथम ठरला आहे. अनेक अभियानामध्ये सहभाग घेवून देवगड पंचायत समिती सातत्य राखत अग्रेसर राहिली आहे.
देवगड पंचायत समिती दुर्लक्षित म्हणून ओळखली जायची. राजकीय विजनवास सोसत पंचायत समिती अग्रक्रमांकावर ठेवण्याची किमया गटविकास अधिकारी विजय चव्हाण व सभापती डॉ. मनोज सारंग यांच्या टीमला करून दाखवावी लागली. देवगड पंचायत समितीमध्ये ३ वर्षांपूर्वी विजय चव्हाण गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाले आणि देवगड पंचायत समितीचे चित्र पालटले. विकास म्हणजे काय? यश म्हणजे काय हे त्यांनी दाखवून देत गेले ३ वर्षे देवगड पंचायत समितीला सातत्याने अग्रक्रमांकावर ठेवण्यात यश मिळविले आहे.
देवगड पंचायत समितीने आयएसओ मानांकन प्राप्त केले. यामध्ये ही पंचायत समिती महाराष्ट्रातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. या पंचायत समिती अंतर्गत येणारे सामान्य प्रशासन विभाग, अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लघु पाटबंधारे विभाग यांनी आयएसओ मानांकन प्रमाणपत्राासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण केले. पंचायत समितीला सन २०१२-१३ मध्ये आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. सर्व विभागांनीशी आयएसओ मानांकन प्राप्त होणारी पंचायत समिती देवगड ही जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
बेघरमुक्त तालुका म्हणून देवगड तालुक्याकडे पाहिले जाते. इंदिरा आवास योजनेअंतर्गत ६९२ बेघर लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यात आली. सद्यस्थितीत देवगड तालुका बेघरमुक्त आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत देवगड तालुक्यामध्ये सर्वात जास्त २१२ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली.
रोजगार हमी योजनेतदेखील कोकण विभागात सर्वोकृष्ट काम करत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना नुसत्या राबविल्या नाही तर यशस्वी करून दाखविल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०११-१२ मध्ये ७०,९९,२५३ इतका खर्च करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. तर सन २०१३-१४ मध्ये २,०१,५२,६८७ रुपये खर्च करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. सन २०१३-१४ मध्ये एकाच दिवशी ३००० पेक्षा जास्त इतके विक्रमी मजूर प्रत्यक्ष कामावर उपस्थित होते.
यावेळी सिंंधुदुर्गातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून देवगड पंचायत समितीचे अभिनंदन केले. सन २०१४-१५ मध्ये ५,१४,३५,८९९ रुपये खर्च करून कोकण विभागामध्ये सर्वप्रथम येण्याच मान मिळविला. तर सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यामध्ये २०६८८५ इतके सर्वाधिक मनुष्य दिवस निर्माण केले. देवगड तालुक्याने बचतगटामध्येही भरीव कामगिरी केलेली असून सन २०१३-१४ मध्ये राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारामध्ये पंचायत समिती देवगड अंतर्गत येणाऱ्या बचतगटांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये जिल्हा स्तरावरतीही देवगड तालुका बचत गटाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अनेक बचतगटांनी प्राप्त करून जिल्ह्यामध्ये देवगड तालुका बचतगटामध्येही अग्रेसर राहिला आहे.
एकूणच देवगड पंचायत समितीने विविध योजना अभियाने राबविण्यात जिल्ह्यात कोकण विभागात किंंबहूना राज्यात अव्वल स्थानावर राहण्याची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. देवगड पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात सलग दोन वेळा प्रथम आली आहे. पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळविणारी राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. रोजगार हमी योजनेतदेखील कोकण विभागात सर्वाेकृष्ट काम करत सभापती डॉ. मनोज सारंग व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना नुसत्याच राबविल्या नाहीत तर यशस्वी करून दाखविल्या आहेत.

पर्यावरण ग्राम झालेला पहिला तालुका
महाराष्ट्रातील देवगड हा पहिला तालुका असा आहे, की ज्याची सर्व गावे पर्यावरण ग्राम झाली आहेत. देवगड तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण व खडकाळ आहे. देवगड तालुक्यात ७४ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींनी पर्यावरण ग्रामसमृद्ध अभियानामध्ये भाग घेवून पुरस्कार
प्राप्त केले आहेत. या योजनेच्या तिसऱ्या वर्षाच्या निकषामध्ये सर्व ग्रामपंचायतींनी योजनेचे निकष पूर्ण केले आहेत. यामध्ये देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. तसेच प्लास्टीक मुक्तीसाठी, सांडपाणी व्यवस्थापन सौर उर्जेचा वापर या बाबींवर खास यशस्वी प्रयत्न केले आहेत.
पंचायत समितीने स्वच्छ भारत अभियानमध्येही चांगली कामगिरी केलेली असून सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनही चांगल्या प्रकारे केलेले आहे. पंंचायत समिती देवगडने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना गावपातळीवर यशस्वी राबवून १०० टक्के उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.

Web Title: Devgad continuously leads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.