देवगडात आणखी तिघे ‘स्वाइन’ सदृश
By Admin | Published: March 27, 2015 11:23 PM2015-03-27T23:23:12+5:302015-03-27T23:58:05+5:30
दोन डॉक्टरांचा समावेश : वैद्यकीय अधीक्षकांचा निष्काळजीपणा
पुरळ : देवगडमध्ये दोन डॉक्टरांसह एका महिलेला ‘स्वाइन फ्लू’ची प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. गुरुवारीच देवगडमधील डॉ. अमरेश आगाशे यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, काही संशयितांचे रक्तनमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्याच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक भिसे यांची सही नसल्याने ते रक्तनमुने तपासणी न करताच परत पाठविण्यात आले आहेत. डॉ. भिसे यांच्या निष्काळजीपणामुळे रक्तनमुने न तपासता मागे आले आहेत. देवगडमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अमरेश आगाशे यांना स्वाइन फ्लू झाल्याचे गुरुवारीच स्पष्ट झाले होते. तसेच त्यांच्या पत्नीलाही स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आली आहेत. अन्य दोन डॉक्टर व खासगी रुग्णालयातील एक महिला कर्मचारी यांनाही प्राथमिक स्वरूपाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. यापूर्वी काही संशयितांचे रक्तनमुने पुणे येथे पाठविले होते. या रक्तनमुन्यांच्या तपासणीबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भिसे यांनी निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)