देवगड नळयोजनेची राणेंनी घेतली दखल

By admin | Published: June 26, 2015 11:39 PM2015-06-26T23:39:53+5:302015-06-27T00:17:08+5:30

देवगड तालुक्याचा पाणी प्रश्न : शिरगाव पाडाघर येथील योजनेला दिली भेट

Devgad Naloyejne Ranenne took over | देवगड नळयोजनेची राणेंनी घेतली दखल

देवगड नळयोजनेची राणेंनी घेतली दखल

Next

शिरगांव : देवगड-जामसंडे पाणी प्रश्न उभा आहे म्हणूनच आमच्या सारख्या वेगळ्या लोकांना जनतेने निवडून दिले आहे. सगळं सुरळीत चाललं असल तर नवीन चेहरे का निवडून दिले असते? आमच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. वेगळं काहीतरी करुन दाखवेन असे नक्कीच जनतेला वाटतं. म्हणूनच मी इथे उभा आहे. नक्कीच वेगळं काम करुन दाखवेन, असे देवगड कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी शिरगाव पाडाघर येथील देवगड नळयोजनेची पाहणी करताना वक्तव्य केले.
पियाळी शिवगंगा नदीवर असलेल्या देवगड प्रादेशिक नळयोजनेच्या अनेक तक्रारींबाबत आमदार नितेश राणे यांनी दखल घेत या नळयोजनेच्या पंपींग स्टेशनला थेट भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी याच नळयोजनेबाबत असलेल्या गावांचा पाणीप्रश्न वेळी वेळोवेळी ऐरणीवर आला आहे. या नळयोजनेतून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिकारी देखभाल दुरुस्तीचे कंत्राटदार यांच्याशी चर्चा करताना आमदार नितेश राणे यांनी खडेबोल सुनावले.
यावेळी राणे म्हणाले की, वीज, पाणी या जनतेच्या मुलभूत गरजा आहे. त्या वेळेवर मिळणे गरजेचे आहे. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपल्या समस्या जनतेला सांगून चालणार नाहीत. यावर कायमस्वरुपी तोडगा निघणे गरजेचे आहे. योजनेचे काम दर्जेदार होणे आवश्यक असून जनतेला त्याचा त्रास होता कामा नये. पाणी प्रश्नासंबंधी कोणाचीही गय केली जाणार नाही. अथवा हितसंबंधही जपले जाणार नाहीत. हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याची गरज आहेच.
अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी टिमवर्क म्हणून काम करणे गरजेचे आहे. एकमेकांशी संवाद व समन्वय साधणे आवश्यक आहे. नळयोजनेला निधी कमी पडणार नाही. अडीअडचणी वेळीच सांगा. त्यावर उपायही करता येतील.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी साटम, सरपंच अमित साटम, पंचायत समिती सदस्य रविंद्र जोगल, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे, विभागीय अध्यक्ष पंकज दुखंडे, संदीप साटम, राजेश कदम, कांदाशेठ माळवदे, योगेश चांदोसकर, तहसीलदार जीवन कांबळे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, प्रभावी उपअभियंता व्ही. जी. वाळके, शाखा अभियंता टी. एम. शिंदे,
जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रमेश मठकर, उपअभियंता व्ही. जे. कुलकर्णी, विज
वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. जी. पालशेतकर, ग्रामविकास अधिकारी चव्हाण उपस्थित
होते. (प्रतिनिधी)


नळयोजनेच्या समस्या- आमदारांच्या सूचना
नवीन पंप घेण्यासाठी प्रयत्न करणार.
वीज खंडीत वेळेत पाणी उपसा करण्यासाठी पंपींग स्टेशनला आमदार निधीतून जनरेटर देणार.
पाणीचोरी प्रश्नी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करुन यावर काय कारवाई करता येईल याबाबत लवकरात लवकर हालचाल करणार.
योजना पुर्नजिवीत करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.
नळयोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही.
या योजनेच्या पुर्नजिवीताबाबत दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
देवगड प्रादेशिक नळयोजना शिरगांव येथे १९७६ पासून कार्यान्वित आहे.
पाणी उपसा करणारे पंप जुनेच असल्याने कमी क्षमतेने पाणी उपसा होतो.
इंटेक वेल नादुरुस्त स्थितीत आहे.
वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पंपींगच्या कामात अडथळे येतात.
पाईपलाईन जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण जास्त आहे.
पाणी चोरी समस्या गंभीर आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग
कायमस्वरुपी शाखा अभियंता नाही. सध्या मालवणचे शाखा अभियंता व्ही. जी. वाळके यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे.


आमदार कसा आहे हे तरी पहा...
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार राणे म्हणाले, अडीअडचणी असतील तर निसंकोच केव्हाही चर्चा करा. कोणत्याही प्रश्नी योग्य वेळी तुम्ही माझ्याकडे मदत मागितली आणि तर मी मदत करतो की नाही हे अजमावून आमदार कसा आहे हे तुम्ही पहा तरी... पाण्यासारख्या प्रश्नाला नेहमीच प्राधान्य देईन. निधीची अडचण भासणार नाही. ही अडचण सोडविण्याची जबाबदारी माझीच राहील.

Web Title: Devgad Naloyejne Ranenne took over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.