धामापूर भगवती मंदिर परीसरात रस्त्यावर मगरीचा संचार, वनविभागाकडून खबरदारीचे आवाहन
By सुधीर राणे | Published: July 18, 2023 04:36 PM2023-07-18T16:36:34+5:302023-07-18T16:36:51+5:30
अमोल गोसावी चौके : मालवण - कुडाळ मार्गावर काल सोमवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक ...
अमोल गोसावी
चौके : मालवण - कुडाळ मार्गावर काल सोमवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास धामापूर तलाव, भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर सुमारे सहा ते आठ फूट लांबीची मोठी मगर आढळली. मालवण येथील वाहन चालकांना ही मगर मुक्तसंचार करताना दिसली. यामुळे धामापूर तलावातील मगरींचे वास्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रात्री रस्त्यावर मगर दिसताच वाहनचालकांनी त्यांचे मित्र ॲड. कन्हैया निवतकर यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी ॲड. निवतकर, सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर यांनी वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना मगरीबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच आज, मंगळवारी वनरक्षक एस. एम. कांबळे, वनपाल राठोड यांनी धामापूर येथे घटनास्थळी पाहणी केली. तर नागरिकांनी तलाव परीसरात फिरताना खबरदारी घ्यावी, तसेच तलावाच्या पाण्यात उतरू असे आवाहन वनरक्षक एस. एम. कांबळे यांनी केले.