अवैध धंद्यांविरोधात ढोल बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:03 PM2020-11-03T16:03:00+5:302020-11-03T16:05:03+5:30

Morcha, Collecatoroffice, sindhudurgnews \ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधित हप्तेखोर अधिकार्‍यांवर कारवाई करून जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद करा. आमदार, खासदार झोपलेत काय? जिल्हा चालवतोय कोण? अवैध धंदेवाले का ? असा प्रश्न केला.

Dhol Bajav Andolan against illegal trades | अवैध धंद्यांविरोधात ढोल बजाव आंदोलन

अवैद्य धंदे तत्काळ बंद करावेत याकरिता सावंतवाडी नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष सावंतवाडी नागरी कृती समिती आक्रमक

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे हप्तेखोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ता अधिक मिळत असल्याने अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद व ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. तर संबंधित हप्तेखोर अधिकार्‍यांवर कारवाई करून जिल्ह्यातील अवैध धंदे तातडीने बंद करा. आमदार, खासदार झोपलेत काय? जिल्हा चालवतोय कोण? अवैध धंदेवाले का ? असा प्रश्न केला.

नागरी कृती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात हरी गावकर, अमोल साटेलकर, श्यामसुंदर आजगावकर, शकुंतला पणशीकर, लता चव्हाण, एल. एस. निचम आदी विविध संघटनांचे पधाधिकारी सहभागी झाले आहेत.

या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनातून त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे हप्तेखोर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. त्यांना वेतनापेक्षा हप्ते अधिक मिळत असल्याने जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पाठीशी घातले जात आहे.

शासनाने बंदी घातलेला गुटखा, गोवा बनावटीची विषारी दारू, अमली पदार्थ याची विक्री आणि तस्करी राजरोसपणे सुरू आहे. अवैध व्यवसायात अल्पवयीन मुलांसहीत तरुण-तरुणी सहभागी होऊन अमली पदार्थांचे शिकार होत आहेत. भेसळयुक्त विषारी दारूमुळे अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

जिल्ह्यातील महिलांना विधवा व मुलांना अनाथ बनविण्याचा कारखाना जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्यांनी लाचखोर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने चालविला आहे, असा आरोप केला आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

 

Web Title: Dhol Bajav Andolan against illegal trades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.