दिगंबरला लागली लॉटरी!
By admin | Published: May 11, 2015 11:10 PM2015-05-11T23:10:54+5:302015-05-11T23:10:54+5:30
छोट्या पडद्यावर ‘कॉमेडी शो’मधून रसिकांना हसवणाऱ्या अभिनेता दिगंबर नाईकला लॉटरी लागलेय. दोन लहान मुलांच्या आयुष्यात लॉटरीच्या तिकिटाचे
कणकवली : वागदेवासीयांनी इशारा दिल्याप्रमाणे सोमवारची महामार्ग चौपदरीकरणाची मोजणी रोखली. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारत प्रांताधिकाऱ्यांनी स्वत: येऊन आमच्या प्रश्नांना लेखी उत्तरे द्यावीत, मगच मोजणी करता येईल, असे ठणकावले.
८ मे रोजी वागदेवासीयांनी महामार्ग चौपदरीकरणाचे सीमांकन झाल्यानंतर मोजणीप्रक्रियेला विरोध प्रगट केला होता. जबाबदार अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या आक्षेपांचे लेखी समाधान केल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी महामार्ग प्राधिकरण सहायक अभियंता प्रकाश चव्हाण, भूमापक एस. एस. बोवलेकर मोजणीसाठी वागदेत उपस्थित झाले. त्यांना ग्रामस्थांनी मोजणीसाठी विरोध केला. सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले आणि अधिकाऱ्यांना तेथे आणण्यात आले. यावेळी सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडिगावकर, आदी उपस्थित होते.
शर्ट काढून भिरकावला
चौपदरीकरणासंदर्भात वागदेवासीयांनी आक्षेप नोंदवले होते व प्रांताधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन करावे अशी मागणी केली होती. तरीही प्रांताधिकारी सोमवारी मुंबईला असल्याचे समजताच वागदे ग्रामस्थ तुषार मिठबांवकर यांनी शर्ट काढून अधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला.
नडगिवेतही मोजणी रोखली
महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील ग्रामस्थांनी सोमवारी जमीन मोजणी रोखली. आपल्याला मोजणीसंदर्भात तसेच मोबदल्याबाबत योग्य ती माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.