डिजिटल इंडियाचे स्वप्न सत्यात उतरल्याचे समाधान
By admin | Published: January 3, 2016 11:50 PM2016-01-03T23:50:56+5:302016-01-04T00:35:41+5:30
मधुकर चव्हाण : गेल्या २० वर्षात अनेकविध उपक्रमांतून शाळेचा कायापालट; अध्ययनात आमुलाग्र बदल
खेड : जिल्हा परिषद शाळा, कर्टेल ही एकेकाळची दुर्लक्षित असलेली शाळा होती. गेल्या २० वर्षात अनेकविध उपक्रमातून शाळेचा कायापालट करण्यात येथील ग्रामस्थांना यश आले, ही समाधानाची बाब आहे. आज ही शाळा डिजिटल झाल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययनात आमुलाग्र बदल घडणार आहे. डिजिटल इंडियाचे मनमोहन सिंग सरकारचे स्वप्न सत्यात उतरत असल्याने समाधान वाटत असल्याचे गौरवोद्गार मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी काढले.
खेड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्टेल गावातील आदर्श गाव डिजिटल शाळेचे उद्घाटन मधु चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. त्यांनी कर्टेल गावच्या सर्वांगिण विकासासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह त्याचे बंधू सभापती चंद्रकांत कदम यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करीत गावात मतभेद न करता केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात विश्व समता राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रभाकर कोळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती चंद्रकांत कदम, शशिकांत चव्हाण, शंकर कांगणे, उपसभापती रवींद्र मोरे, जिल्हा परिषद सदस्य महिपत पाटणे, सरपंच महेंद्र कदम, समीर चव्हाण, प्रमिला चव्हाण, संजय हिंगावार, सुनील सावंत, अक्षता चव्हाण, ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक श्रीकांत चाळके आदी मान्यवर उपस्थित होते़
या डिजिटल शाळेसाठी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, पर्शुराम चव्हाण आणि वामन चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले आहे. हा उपक्रम यशस्वी होणेसाठी शाखाप्रमुख उमेश चव्हाण, दीपक चव्हाण, दिनेश चव्हाण व मधुकर सावंत तसेच मिथुन गमरे, अनिल येलवे, जयवंत सावंत आदिंनी सहकार्य केले़ शाळेतील शिक्षिका प्रमिला राठोड, सुरसिंग ठाकरे, अनिल कालेकर, केंद्रप्रमुख दीपक बुरटे, संजय जाधव, विश्नाथ पवार, मंगेश वायकर, संदीप घाणेकर, पर्शराम पेवेकर यांच्यासह मुंबईहून आलेले शैलेश चव्हाण, राजेश चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, अजय जागडे, लवु चव्हाण, मनोहर चव्हाण, संतोष चव्हाण, अरविंद चव्हाण, संजय येलवे, रामचंद्र येलवे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)