डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

By admin | Published: February 2, 2015 10:55 PM2015-02-02T22:55:41+5:302015-02-02T23:45:37+5:30

सुमारे एक कोटीचे नुकसान : पंधरा दिवसांत दुसरी घटना

At the Dinge, there are 16 acres of cashew nuts in the fire | डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

डिंगणे येथे आगीत सोळाशे एकरांतील काजू कलमे खाक

Next

बांदा : डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवर सोमवारी दुपारी पेटलेल्या वणव्यात तब्बल सोळाशे एकरमधील काजू बाग जळून खाक झाली. हजारो काजू कलमे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांत आगीची या परिसरातील ही दुसरी घटना असून, ऐन काजू हंगामात बाग जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.डिंगणे-डेगवे गावांच्या सीमेवरील टाकवाडी, भोमवाडी व इसवाचे भरड हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. हजारो काजू कलमांबरोबरच माळरानावरील लाखो रुपये किमतीचे गवतही जळून खाक झाले. सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टाकवाडीलगतच्या डोंगरात आग लागली. दुपारी वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत तब्बल दोन डोंगर जळून खाक झाले. दुपारच्या दरम्यान आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये टाकवाडी, भोमवाडी परिसरातील सोमा सावंत, सखाराम वासुदेव देसाई, एकनाथ अनंत सावंत, रामा शंभा सावंत, बापू अर्जुन सावंत, गणपत शंकर देसाई, भगवान शंकर देसाई, लवू नवसो देसाई, तुकाराम पांडुरंग देसाई, नाना सावंत, चंद्रकांत राजाराम देसाई, सूर्यकांत राजाराम देसाई, चंद्रकांत कुसो देसाई यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची सुमारे सोळाशे एकरमधील हजारो काजू कलमे व कित्येक गवताची उडवी जळून खाक झाली. डेगवे व डिंगणेवासीय सायंकाळी उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर बेचिराख झाला. काजू बागायतीमध्ये गवत असल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने आग भडकली. स्थानिकांनी पाणी व मातीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.सायंकाळी उशिरा डेगवे तलाठी किरण गझीनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोळाशे एकर परिसरात सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न
डिंगणे व डेगवे गावातील शेतकऱ्यांनी या परिसरात मोठ्या मेहनतीने काजू बागा उभ्या केल्या होत्या.
पंधरा दिवसांपूर्वी रात्री लागलेल्या आगीत शेतकऱ्यांची काजू बागाजळून खाक झाली होती. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी जिवावर बेतून ही आग आटोक्यात आणली.
मात्र, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी वाचविलेली काजू बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाकडून करण्यात येणाऱ्या
पंचनाम्यात नुकसानभरपाई मिळत
नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title: At the Dinge, there are 16 acres of cashew nuts in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.