केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली; सुषमा अंधारेची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:53 PM2022-11-23T23:53:52+5:302022-11-23T23:54:19+5:30
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम ...
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी नुसता केंद्रीय मंत्री नारायण राणे याच्या दहशतवादाचा बागुलबुवा करून जिल्हावासियामध्ये संभ्रम निर्माण केला आणि ते जेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त ठेके हे माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणेंना यानाच दिले असा गंभीर आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
केसरकर जरी राणेचा दहशतवाद संपला म्हणून सांगत असले तरी तो सत्तेसाठी असून दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ हेच यामागचे त्याचे धोरण असल्याची टिका ही अंधारे यांनी यावेळी केली.त्या बुधवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाडी,जिल्हाप्रमुख संजय पडते,रूपेश राऊळ,जान्हवी सावंत,चंद्रकांत कासार,चंद्रकांत गावडे,मायकल डिसोजा आदि उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहि नेते पक्ष सोडून गेले असले तरी कार्यकर्ता हा तिथेच आहे. मंत्री केसरकर यांच्या छुपा दहशतवाद सर्वाना कळून चुकला आहे.आता पर्यत रोजगाराची अनेक आश्वासने त्यांनी दिली पण प्रत्यक्षात काथ्या कारखाना,चष्म्याच्या कारखान्याचे काय झाले ते सांगू शकले नाहीत.आता येथील जनता केसरकर यांच्या भुलभुलेय्याना फासणारी नाही.निवडणुकीत योग्य उत्तर देणार आहे.दहशतवाद म्हणून ओरड मारून मते घेतली आणि आता तेच राणेचा दहशतवाद संपला म्हणतात मग हा दहशतवाद सत्तेसाठी संपला म्हणायचा का?म्हणजे सत्तेसाठी दोघे मिळून सिंधुदुर्ग विकून खाऊ असेच यांचे धोरण असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला आहे.
केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतना अनेक ठेके राणेंनाच देत असत मग दहशतवाद कसला म्हणायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.जे 40 आमदार सोडून गेले आहेत त्यातील अनेक जण आमच्या सर्पकात आहेत.त्यात मंत्री दीपक केसरकर नाहीत कारण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरही थांबणार नसून भाजपात जाणार असल्याचा गौप्यस्फोट अंधारे यांनी केला आहे.
राष्ट्रीय राजकारणात भाजप विरोधी मोठ बांधायची आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिका ऐवढे छोटे कारण नसून ते राष्ट्रीय राजकारणात सर्व युवा चेहरे एकत्र येऊन भाजप विरोधी एक मोठ बांधणे गरजेचे आहे.जे देशात राजकारण सुरू आहे.ते थांबवण्याची गरज असून सगळे युवा चेहरे एकत्र आल्यास नक्कीच त्यात बदल होईल.
कर्नाटकने घेतलेला निर्णय म्हणजे भाजपची कुटील निती
कर्नाटक सरकार ने सांगली जिल्ह्य़ातील 40 गावावर दावा सांगितला तो दावा म्हणजे भाजप च्या राजकारणाचा कुटील डाव असून,हे कुठेतरी थांबले पाहिजे जे 40 जण शिवसेनेतून गेले आहेत ते गप्प का? बसले आहेत ते दिल्लीतील अमराठी नेत्यासमोर गप्प का बसतात असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांनी केला आहे.